शिवसेनेत फूट पाडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. या आरोपाला भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. स्वत:च महत्त्व वाढवण्यासाठी असे आरोप केले जात असतात, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
“ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी पवार कुटुंबात कोणतेही हेवेदावे नसून, सर्वांचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, असंही सांगितलं.
“माझं चिन्ह, पक्षनाव गोठवलंत, पण एवढं करूनही…”, उद्धव ठाकरेंचं भाजपावर टीकास्र!
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीनंतर महाराष्ट्रासंदर्भात झालेल्या निर्णयांबाबत फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली. या भेटीनंतर मुंबई ते सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला मान्यता देण्यात आल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे. याशिवाय मुंबईतील धारावीच्या पूर्नविकासातील अडचणी दूर झाल्याचंही त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राला ‘राज्यगीत’ मिळणार; ‘या’ गीतावर एकमत, सुधीर मुनगंटीवारांची मोठी घोषणा!
“नागपूर रेल्वे स्थानकाच्या पूर्नविकासासाठी रेल्वे मंत्र्यांनी ४७२ कोटींच्या निधीला मंजुरी दिली आहे. समृद्धी महामार्गालगत हायस्पीड रेल्वे आणि कार्गो चालवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. पुणे ते नाशिक दरम्यान रेल कम रोड प्रकल्पाबाबत ही बैठक पार पडली” अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचीही भेट घेतली. या बैठकीत ‘एअर इंडिया’ची इमारत महाराष्ट्र सरकारला देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली. राज्यातील पूरग्रस्तांना तातडीनं मदत करण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच आदेश दिल्याची माहितीही त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.