सावंतवाडी : महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रध्देने पूजा-अर्चना करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्या तीर्थक्षेत्रामध्ये ठरलेल्या मुहुर्तावर यात्रा, पूजा होत असतात. सण, उत्सव आपली परंपरा आहे. आपल्याला आपली संस्कृती आणि परंपरा पुढे घेऊन जायची असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवदर्शन घेतले. दर्शनानंतर श्री शिंदे यांचा पालकमंत्री नितेश राणे आणि मंदिर व्यवस्थापन समितीच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे, आमदार रविंद्र फाटक, आमदार किरण सामंत आदी उपस्थित होते.

श्री शिंदे म्हणाले, कुणकेश्वर येथे दर्शनासाठी येण्याची माझी खुप इच्छा होती आणि आज ती पुर्ण झाली. कोकणाच्या विकासाला शासनाने नेहमी प्राधान्य दिले आहे. कोकणात नवनवीन प्रकल्प आणण्यासाठी शासन कटिबध्द आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे आणि नागपूर ते मुंबई बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे अशाच प्रकारचा दृतगती महामार्ग म्हणजेच सुपर एक्सप्रेस वे मुंबई ते सिंधुदुर्ग आपण करतोय त्यामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने पर्यटन वाढीसाठी सर्वस्वी प्रयत्न करणार आहोत. पर्यटनाला चालना दिली तर तरुणांना जिल्ह्यातच काम मिळेल असेही ते म्हणाले.