विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर बुधवारी सविस्तर निकाल दिला. या निकालपत्रात राहुल नार्वेकरांनी मूळ शिवसेना कुणाची इथपासून ते दोन्ही बाजूंनी दोन्ही गटातील आमदारांविरोधात अपात्रतेच्या याचिकांवर केलेल्या युक्तिवादांवर निकाल दिला. या निकालानंतर त्यावर ठाकरे गट व काँग्रेस-राष्ट्रवादीकडून परखड शब्दांत टीका करण्यात आली आहे. हा निकाल म्हणजे भाजपाचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात विचारणा केली असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नार्वेकरांचं कौतुक, ठाकरेंवर टीका
गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस उपस्थित असताना त्यांना माध्यम प्रतिनिधींनी नार्वेकरांच्या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांच्या निकालाचं कौतुक करतानाच ठाकरे गटावर खोचक शब्दांत टीका केली.
“हा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे. मी त्यासंदर्भात आनंद व्यक्त करतो. आता कुणाच्याही मनात ही शंका असण्याचं कारण नाही की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
“कायदा न समजणारे लोक टीका करतात”
“ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही असे लोक टीका करतात. मला याचं आश्चर्य वाटत नाही. कारण हे तेच लोक आहेत जे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात निकाल गेला तर सर्वोच्च न्यायालयावरही आरोप करतात. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांवर आरोप केला याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण मला माहिती होतं, काहीही निकाल आला तरी हे आरोप करणारच आहेत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टांगती तलवार अद्यापही कायम…
“ठाकरे गटाचे आमदार पात्र ठरले, पण…”
दरम्यान, राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या अपात्रतेच्या याचिकेप्रमाणेच शिंदे गटानं दाखल केलेली अपात्रतेची याचिकाही फेटाळून लावली. त्यामुळे यासंदर्भात पाठपुरावा करण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली असताना त्यावर देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“ठाकरे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाली नाही म्हणजे ते पात्र ठरले आहेत. अध्यक्षांनी त्यांना तांत्रिक कारणांमुळे पात्र ठरवलं आहे. पण याचा अर्थ त्यांच्या गटाला शिवसेना मानलंय असं नाहीये. शिवसेना पक्ष अतिशय सार्थ पद्धतीने अध्यक्षांनी ठरवला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या तीन मुद्द्यांवर अध्यक्षांनी अतिशय विस्तृत विवेचन केलंय. उदाहरणार्थ, ठाकरे गटाची शिवसेनेतली नेत्यांची फळी त्यांच्याच घटनेनुसार नव्हती. त्यांनी सादर केलेल्या घटनेनुसार निवड झाली नव्हती. त्यामुळे नियमानुसार ते पात्रच होत नाहीत. कायदेतज्ज्ञ त्याचं विवेचन करतीलच. पण हा कायदेशीर असा निकाल अध्यक्षांनी दिला आहे”, असं देवेंद्र फडणवीस आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणाले.
काय निकाल दिला राहुल नार्वेकर यांनी?
राहुल नार्वेकरांनी निकालात प्रामुख्याने ६ मुद्द्यांचा समावेश केला.…
१. खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच.
२. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड योग्यच.
३. एकनाथ शिंदेंची गटनेतेपदी निवड योग्यच.
४. पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंना पदावरून काढण्याचा अधिकार नाही
५. सुनील प्रभूंचा व्हिप गैरलागू ठरल्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.
६. शिंदे गटानं बजावलेल्या व्हिपमध्ये तांत्रिक त्रुटी असल्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही.