शासकीय निधीतून अनेक कल्याणकारी योजना सुरू होतात. त्या सुरू ठेवण्यासाठी लोकसहभागाची गरज आहे. विकासकामे करताना राजकारण करण्याची गरज नसून, आपण विकासकामे पक्षनिरपेक्षतेने करू, असे प्रतिपादन सहकार, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केले.
गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अॅड. श्रीपतराव िशदे होते. रामनाथगिरी मठाचे मठाधिपती भगवानगिरी महाराज, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरी, बाबा देसाई, यांची कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पेयजल योजना जलशुद्धीकरण केंद्राच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. कसबा नूल येथील राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९८ लाख रुपये खर्च आला आहे.
पालकमंत्री पाटील म्हणाले, शासन अनेक कल्याणकारी योजना सुरू करते. परंतु, पाटबंधारे, पिण्याच्या पाण्याची योजना यांसारख्या योजना थकित वीजबिलामुळे बंद पडतात. अशा कल्याणकारी योजना सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी वृत्ती बदलण्याची गरज आहे. योजना सुरू राहण्यासाठी नागरिकांनी वीजबिल भरून आवश्यक ते सहकार्य करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात रस्त्यांसाठी जवळपास १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, सहकार व पणन विभाग यातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत, असे सांगून पाटील यांनी कसबा नूल गावचे ग्रामसचिवालय करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करू. तसेच इतर विकासकामांच्या प्रस्तावासाठी आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पक्षनिरपेक्षतेने आणि राजकारणविरहित सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.
अॅड्. श्रीपतराव िशदे म्हणाले, नूल गावाला एक परंपरा आहे. गडिहग्लज तालुक्यात सर्वात जास्त स्वातंत्र्यसनिक असलेले आणि सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण असलेले तसेच विधायक कामात अग्रेसर असलेले हे गाव आहे. त्यामुळे नूल गावाच्या कामांसाठी शासनाने आवश्यक ते सहकार्य करावे व ग्रामस्थांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेची माहिती दिली. श्रीमती स्वाती कोरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्राध्यापक राजा माळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नीलकंठ कुराडे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा