केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात लक्ष घातले तर, शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल बांधला जाऊ शकतो, असे विधान राज्यमंत्री व शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी मंगळवारी केले होते. नितीन गडकरी हे देशाच्या राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ आहेत. त्यांनी पूल बांधायचे ठरवले तर ते कसेही आणि कुठेही उभे राहू शकतात. भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा मैत्रीचा पूल उभारून दोन्ही पक्षांमधील नातेसंबंध जोडले जाऊ शकतात. गडकरी यांनी मनावर घेतले तर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतील. गडकरी व अमित शहा यांनी पुढाकार घेतला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे सत्तार यांनी म्हटले होते.

त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना टोला लगावला आहे. “नितीन गडकरी हे करु शकतात असं अब्दुल सत्तार यांना वाटतं याचा मला आनंद आहे. नितीन गडकरी मोठे नेते आहेत पण अब्दुल सत्तार नया है वह. त्यांना शिवसेनेचे काहीच माहिती नाही. गेल्या पाच सहा महिन्यांमध्ये ते उद्ध ठाकरेंना भेटले असल्याचे मला माहिती नाही. असं बोलण्यासाठी कुणी महत्त्वाचा माणूस लागतो,” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Image Of Jagdeep Dhankhar.
Jagdeep Dhankhar : “जग आपल्याकडे पाहत आहे, तरीही आपण…” संसदेतील गदारोळावर राज्यसभेच्या सभापतींची उद्विग्न प्रतिक्रिया
Nagpur issue of Massajog Sarpanch Santosh Deshmukhs murder case Dhananjay Munde
Dhananjay Munde : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
Mallikarjun Kharge criticizes Prime Minister Narendra Modi
भूतकाळात नव्हे वर्तमानात वावरा! खरगे यांचा पंतप्रधान मोदी यांना टोला
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil : मंत्रिपद न मिळाल्याने नाराज आहात का? दिलीप वळसे पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; भुजबळांबाबतही केलं मोठं भाष्य
Dhananjay Munde On Chhagan Bhujbal
Dhananjay Munde : छगन भुजबळांच्या नाराजीवर धनंजय मुंडेंचं मोठं विधान; म्हणाले, “अजित पवार स्वत:…”

“तरी मला अपेक्षा होती की आदित्य ठाकरेंना..”; नवीन विद्यापीठ कायद्यावरुन देवेंद्र फडणवीसांचा सरकारवर निशाणा

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका निवडणुकीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांची घेतलेल्या बैठकीबाबतही भाष्य केले. यावेळी विरोधकांच्या टीकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना आपल्यावर होणाऱ्या टीकेला शांतपणे घेतो, ज्याला दाखवायचं आहे त्याला त्याचवेळी मी करुन दाखवतो असं म्हटले. त्यावर “टीकांकडे लक्ष देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिले तर अधिक चांगलं होईल. ज्या प्रकारचे काळे कायदे ते विना चर्चेचे, मध्यरात्री पारित करत असल्याचा पळपुटेपणा महाराष्ट्राने पाहिला नसून त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“ …तर आपल्याला काळ देखील माफ करणार नाही”; राज्यातील परीक्षा घोटाळ्यांवरुन देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

‘रश्मी ठाकरे यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी रश्मी ठाकरे सांभाळू शकतात. रश्मी ठाकरे यांना राज्यातील राजकारणाची जाण आहे व त्यांच्याकडे क्षमताही आहे. उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाला कोणीही विरोध करू शकणार नाहीत, असेही सत्तार म्हणाले.

Story img Loader