Devendra Fadnavis on Loksabha Election Results in Maharashtra: अवघ्या तीन आठवड्यांत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. त्यानिमित्ताने महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी अशा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवार जाहीर करण्याबाबतच्या घडामोडी वेगाने घडत आहेत. महायुतीमध्ये भाजपा, शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षामध्ये जागावाटपाचा अंतिम आकडा अद्याप निश्चित झालेला नसतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक विधान चर्चेत आलं आहे.

भारतीय जनता पक्षानं आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जागांची संख्या १४६ च्या घरात गेली आहे. आधी ९९, मग २२ व शेवटी २५ अशा तीन उमेदवार याद्या पक्षाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकसभेवेळी जिंकलेल्या जागा व विद्यमान आमदारांची संख्या या आधारावर जिंकून येण्याच्या मेरीटच्या आधारे तिकीट वाटप करण्यात आल्याचा दावा सर्वच पक्ष करत आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

Mohol Constituency Politics
Mohol Constituency Politics : मोठी बातमी! शरद पवारांनी मोहोळमध्ये उमेदवार बदलला; सिद्धी कदम यांच्याऐवजी ‘या’ नेत्याला दिली उमेदवारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी; कारवाईचं कारण काय?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
devendra fadnavis on amit thackeray
अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर देवेंद्र फडणवीस म्हणतात, “राज ठाकरेंनी या एका जागेवर…”
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस सोमवारी संध्याकाळी टीव्ही ९ च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकांमधील भारतीय जनता पक्षाच्या कामगिरीबाबत भाष्य केलं. तसेच, महायुतीच्याही कामगिरीवर भूमिका मांडली. महायुतीच्या पीछेहाटीमागे विरोधकांकडून करण्यात आलेला अपप्रचार कारणीभूत होता, असं ते म्हणाले.

“लोकसभा निवडणुकीत अपप्रचार झाला होता. त्या निवडणुकीत मविआला ४३.९ टक्के मतं मिळाली. आम्हाला ४३.६ टक्के मतं मिळाली. ०.३ टक्क्यांनी ते आमच्यापुढे होते. पण जागा मोठ्या प्रमाणावर तिकडे गेल्या. संविधानाबाबतच्या अपप्रचाराला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही. महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो. ज्या ताकदीनं त्या अपप्रचाराचा विरोध केला जायला हवा होता, तेवढा आम्ही केला नाही. आम्हाला वाटलं त्याचा तेवढा प्रभाव पडणार नाही. पण त्याचा प्रभाव पडला. आमच्याविरोधात लोकांचं मत गेलं. त्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

Devendra Fadnavis: फडणवीस यांच्या सचिवाला उमेदवारी, भाजपचे आतापर्यंत १४६ उमेदवार जाहीर

d

“महाराष्ट्रात वोट जिहाद”

“महाराष्ट्रात एक वोट जिहादही झालं. धार्मिक स्थळांवरून लोकांना अमुक प्रकारे मतदान करण्याचं आवाहन केलं गेलं. असं केलं तर तुम्ही अल्लाला किंवा देवाला दगा द्याल असं आवाहन झालं. धुळे लोकसभा मतदारसंघातल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी आम्ही १ लाख ९० हजारांनी पुढे होतो. पण मालेगाव सेंट्रलमध्ये १ लाख ९४ हजारांनी आम्ही पिछाडीवर गेलो आणि चार हजारांनी आम्ही हरलो. त्यामुळे वोट जिहादमुळे हे घडलं”, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

फडणवीसांना विजयाचा आत्मविश्वास कशाच्या आधारावर?

देवेंद्र फडणवीसांनी यावेळी लोकसभेसारखी स्थिती नसल्याचा दावा केला. “आता अपप्रचार उघडा पडला आहे. लोकांना कळलंय की संविधान बदललं जाणार नाहीये, आरक्षणावर कोणताही धोका नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हातात संविधान घेऊ फिरणारे राहुल गांधी अमेरिकेत जाऊन सांगतात की आरक्षण पूर्णपणे काढलं जाईल. वोट जिहादच्या माध्यमातून एका जागेवरून आख्खा लोकसभा मतदारसंघ पराभूत होऊ शकत होता, तसं आता होऊ शकत नाही. आता एका जागेमुळे सहा जागा प्रभावित केल्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तेव्हा जी परिस्थिती होती, ती आता संपली आहे. आता मला पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्ही ही निवडणूक जिंकू”, असं फडणवीस म्हणाले.

Story img Loader