राज्यात येणारे काही महत्त्वाचे प्रकल्प परराज्यात गेल्यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली जात आहे. असे असतानाच आता केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मंजुरी दिली आहे. याअंतर्गत पुण्यातील रांजणगाव येथे साधारण २००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> Video : हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुमचे व्हिडीओ शुटिंग केल्याने विराट संतापला; ‘खासगी आयुष्य जपा’ म्हणत व्यक्त केली नाराजी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने पुण्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारण्यास मान्यता दिल्याची माहिती दिली आहे. या प्रकल्पांतर्गत साधारण २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांशी संबंधित असलेल्या राष्ट्रीय धोरणांतर्गत राज्यात हे क्लस्टर उभे राहणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात साधारण ५००० हजार रोजगारनिर्मिती होणार असल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच हा प्रकल्प रांजणगावमधील २९७.११ एकर परिसरात उभा राहणार असून त्यासाठी ४९२.८५ कोटी रुपये खर्च केले जातील. आगामी ३२ महिन्यांत हा प्रकल्प उभा राहील, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा >>> ‘कॅग’ चौकशीवरून आमदार प्रसाद लाड यांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्र; म्हणाले, “मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी…”

हेही वाचा >>> मुंबई पालिकेच्या कामांची ‘कॅग’मार्फत चौकशी होणार, मनसेची पहिली प्रतिक्रिया; देशपांडे म्हणाले “महानरपालिकेत वीरप्पन गँग…”

शिंदे-फडणवीस यांच्याकडून दोन महिन्यांपासून पाठपुरावा

या इलेक्ट्रॉनिक क्लस्टरबाबत केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी अधिक माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील रांजगणगाव येथे इलेक्ट्रॉनिक क्लस्टरची उभारणी करण्यात येणार आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रकल्पासाठी पाठवपुरावा करत आहेत. याच कारणामुळे हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीचे क्षेत्र खूप मोठे आहे. यामध्ये काम करण्यासाठी खूप वाव आहे. एखादा प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेला असेल तर, फार मोठा फरक पडणार नाही. या प्रकल्पामुळे हजारो, लाखो रोजगार निर्माण होणार आहेत, असे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले आहे.