एबीपी माझाच्या बालदिन विशेष कार्यक्रमात आज राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी चिमुकल्यांबरोबर मनसोक्त गप्पा मारल्या. तसेच त्यांच्या विविध प्रशांची उत्तरंही दिली. दरम्यान, यावेळी एका चिमुकलीने त्यांना आम्हाला शिक्षक रागवतात तसे मोदी आजोबा तुम्हाला रागावतात का? असा प्रश्न विचारला असता, त्यांनी यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत माहिती दिली.
हेही वाचा – ‘महाविकास आघाडीमुळे उद्योग व प्रकल्प राज्याबाहेर गेले’; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“होय, एखाद्यावेळी आम्हालाही ओरडा मिळतो. पण बऱ्याच वेळा ते ओरडत नाहीत, तर समजावून सांगतात. मोदीजी देशाचे पंतप्रधान आहेतच, पण एकप्रकारे आमचे पालकही आहेत. त्यांनी कोणतीही गोष्ट करताना शिस्त लागते. एखादं काम चुकीचं झालं, तर त्यांना आवडत नाही. जेव्हा आमची बैठक होते, त्यावेळी ते आम्हाला आमच्या चुकीच्या गोष्टींबाबत सांगतात. मात्र, ते रागावण्यापेक्षा दिशा देण्यासारखं असतं. ते प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवतात आणि एखादी गोष्ट चूकत असेल तर लक्षात आणून देतात”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – राजकारणातील कटुता दूर करण्यासाठी सर्वानी एकत्र येणे आवश्यक; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
दरम्यान, यावेळी अन्य एका चिमुकल्याने त्यांना गोड काय आवडतं? याबाबत विचारलं असता, उत्तरांच्या सुरुवातीलाच मला पुरणपोळी आवडत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. “मला पुरणपोळी आवडत नाही. मात्र, माझ्या पत्नीच्या एका उत्तराने अनेकांचा समज झाला आहे की, मला पुरण पोळी आडवते आणि मी कुठंही गेलो तरी लोकं मला पुरणपोळीचं देतात. त्यामुळे मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छतो की मला पुरणपोळी आवडत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – “होय, उपमुख्यमंत्रीपद मिळणं माझ्यासाठी धक्का होता” फडणवीसांनी दिली कबुली, म्हणाले…
दरम्यान, शाळेतील खेळाचे तास वाढवून मिळेल का? अशी मागणी एका मुलीने केली असता, राज्यांतील शाळांच्या संचालकांशी चर्चा करून त्याबाबत नक्कीच घेऊ असे आश्वासनही त्यांनी चिमुकल्यांना दिले. तसेच एका चिमुकलीने तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही काय करता? असा प्रश्न विचारला असता, सहसा मला राग येत नाही. फक्त मला भूक लागल्यानंतर राग येतो. मात्र, कोणी काही खायला दिलं की माझा राग शांत होतो. त्यामुळे माझ्या रागावरचा उपाय हा मला काहीतरी खायला देणे हाच आहे, असेही त्यांनी सांगितले.