Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लाडकी बहीण योजना, पुढील पाच वर्षांतल्या जबाबदाऱ्या यावर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा जपत शत्रूत्व नसेल हेही त्यांनीसांगितलं. त्यावेळी, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावरही फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

लाडकी बहीण योजना आम्हीच सुरुच ठेवणार आहोत. तसंच २१०० रुपयेही आम्ही देणार आहोत. आता अर्थसंकल्पात त्याचा विचार आम्ही करु. आपले जे आर्थिक स्रोत चॅनलाईझ्ड झाल्यानंतरच हे करणं शक्य आहे. जी आश्वासनं दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करु त्याकरिता ज्या व्यवस्था करायच्या आहेत त्या आम्ही आधी करणार आहोत. स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल. शेतकरी सन्मान योजना जेव्हा पंतप्रधान मोदींनी सुरु केली तेव्हा पहिल्या टप्प्यात असं कळलं की काही मोठ्या शेतकऱ्यांनाही ते मिळालं आहे. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच सांगितलं की आम्ही निकषात बसत नाही. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत निकषांच्या बाहेरच्या काही बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल पण सरसकट पुनर्विचार केला जाणार नाही. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “श्रद्धा आणि सबुरीचा अर्थ समजला नाही, त्यांची हालत काय झाली? हे विधानसभेला…”, देवेंद्र फडणवीसांची विरोधकांवर टीका
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला सांगितलं तर व्हाल का? मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “पक्ष जे सांगेल…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”
Devendra Fadnavis On Raj Thackeray or Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : राज ठाकरे की उद्धव ठाकरे? देवेंद्र फडणवीसांनी दिलं राजकीय उत्तर; म्हणाले, “राजकारणात काहीही…”
What Devendra Fadnavis Said About Uddhav Thackray?
Devendra Fadnavis : “चंद्रपूरचे आपण सगळेच वाली! कुणीही सुग्रीव नाही, मी कुणासारखा जोक…”; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला?
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आम्ही ‘वार’ आडनाव असलेल्यांचा सन्मान करतो, कारण…”, मुनगंटीवार, वडेट्टीवारांचा उल्लेख करत फडणवीस काय म्हणाले?
Devendra Fadnavis News
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “मागच्या दहा वर्षांत २०१९ हे वर्ष आलंच नसतं तर…”

उद्धव ठाकरे ३१ जुलैला काय म्हणाले होते?

उद्धव ठाकरेंनी ३१ जुलैच्या दिवशी मुंबईतल्या रंगशारदा या ठिकाणी मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांच्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना जोरदार आव्हानही दिलं. “मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस डाव आखत होते. मात्र मी सगळं काही सहन करुन उभा राहिलो आहे. मी तडफेने उतरलो आहे. आता एक तर तू राहशील किंवा मी राहिन. गीतेमध्येही हेच आहे. अर्जुनाने पाहिलं की त्याच्यासमोर त्याचे नातेवाईकच उभे आहेत तेव्हा त्यालाही यातनाच झाल्या होत्या. मलाही यातना होत नसतील का? पण भाजपा म्हणजे चोर कंपनी आहे.” असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- CM Devendra Fadnavis: गतिमान सरकार! शपथ घेतल्यानंतर पहिल्या तासातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली मंत्रिमंडळ बैठक, घेतला मोठा निर्णय

उद्धव ठाकरेंच्या या आव्हानाबाबत विचारलं असता काय म्हणाले फडणवीस?

मी उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांसह सर्वच प्रमुख नेत्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं. त्यावेळी, सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं, पण ते वैयक्तिक कारणास्तव शपथविधीला येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रात जो राजकीय संवाद आहे, विशेषतः दाक्षिणात्य राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात हा फरक आहे, महाराष्ट्रात राजकीय संवाद संपलेला नाही. पण अनेक राज्यामध्ये दोन राजकीय पक्ष आणि नेत्यांमध्ये एवढा विसंवाद असतो की जणू खून के प्यासे असं पाहायला मिळतं. महाराष्ट्रात ती कधी नव्हती आणि पुढेही राहू नये हा माझा प्रयत्न असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. त्यावेळी, उद्धव ठाकरेंनी केलेल्या एक तर तू राहिन किंवा मी राहिन या वक्तव्यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देखील फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ”मी त्याही वेळेस सांगितलं होतं. राजकारणात तेही राहतील, मीही राहिन, सगळेच राहतात, ”अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी दिली.

Story img Loader