Devendra Fadnavis : HMPV व्हायरसने चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसचा (एचएमपीव्ही) उद्रेक सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमीत तपासणीदरम्यान किमान दोन एचएमपीव्हीचे रूग्ण आढळून आले आहेत. या दरम्यान या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

आरोग्य मंत्रालयाने नेमकं काय म्हटलं आहे?

भारतातील या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये एचएमपीव्ही भारतासह जागतिक स्तरावर आधीपासूनच प्रसारित झाला आहे आणि विविध देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवले जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कुठलाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही, म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या व्हायरसमुळे घाबरु नका असं आवाहन केलं आहे.

Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
government land sale controversy report against female tehsildar news in marathi
बापरे..! महिला तहसीलदाराकडून चक्क शासकीय भूखंडांची विक्री; निलंबन केल्याखेरीज चौकशी अशक्यः एसडीओ डव्हळे
Minor girls unsafe in Raigad district 74 rape cases
रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुली असुरक्षित; वर्षभरात ७४ प्रकरणे उजेडात
MLA Satej Patil On Madhurima Raje
Satej Patil : Video : मधुरिमाराजे यांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर; म्हणाले, “उद्या योग्य तो निर्णय…”
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Chandrashekhar Bawankule Answer to Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरे अतिविलासी, मातोश्री २ च्या…”, मोदींवर टीका केल्यानंतर भाजपाचं उत्तर
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

हे पण वाचा- HMPV Virus Causes Treatment : एचएमपीव्ही व्हायरसचा कहर! हा आजार किती घातक, नेमकी लक्षणे काय? संसर्गावर उपाय कोणते? जाणून घ्या सर्व काही….

काय म्हटलं देवेंद्र फडणवीस यांनी?

HMPV या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसतो आहे. यासंदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यांना माहिती देण्याचं ठरवलं आहे. या व्हायरसला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातल कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल ती माहितीच द्यावी. आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक चालू आहे, असं सांगितलं आहे.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसची (HMPV) लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दर्शविते. त्यामध्ये खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचा समावेश आहे. कोविड-१९ नंतर पाच वर्षांनंतर ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे, ज्यामुळे अधिकारी चिंतेत आहेत. परिणामी, अधिकारी लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत आहेत.

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस काय आहे?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा आरएनए विषाणू आहे, जो न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा याचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधन असे सूचित करते की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रसारित आहे आणि आता जागतिक स्तरावर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकताना आणि शिंकताना बाहेर काढलेल्या श्वसनाच्या थेंबांद्वारे पसरतो.

Story img Loader