बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन विकत घेतली, याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, फडणवीस यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधांचा स्फोट करणार आहे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. त्यानंतर नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.

“महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर आरोप लावले त्याचा खुलासा मी केला. मी मंत्री असताना सलीम पटेलबाबत तुम्हाला माहिती नव्हती का असे देवेंद्र फडणवीसांनी विचारले होते. २००५ मध्ये मी मंत्रीपदावर नव्हतो. आम्ही संपत्ती खरेदी केल्यानंतर सलीम पटेलचा व्हिडीओ व्हायरला झाला होता. पाच महिन्यांपूर्वी मला माहिती मिळाली की त्यांचा मृत्यू झाला आहे. शाहवली खानसोबत व्यवहार केल्याचे त्यांनी म्हटले. तिथल्या जागेच्या वॉचमनचा तो मुलगा होता आणि त्याने त्या जागेच्या कागदपत्रांवर त्याचे नाव लावले होते. ते काढण्यासाठी आम्ही त्याला पैसे दिले हे सत्य आहे,” असे नवाब मलिकांनी सांगितले.

rahul gandhi devendra fadnavis
Devendra Fadnavis: “…हेच राहुल गांधींचं एकमेव ध्येय”, देवेंद्र फडणवीसांची बीड-परभणी दौऱ्यावरून थेट टीका!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Gandhi On Somnath Suryavanshi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा गंभीर आरोप, “सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानेच त्याची हत्या…”
Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
There will be investigation into bogus crop insurance case says Devendra Fadnavis
तर पीक विम्याच्या बोगस प्रकरणाची सखोल चौकशी- देवेंद्र फडणवीस
Deep investigation into bogus crop insurance Devendra Fadnavis assures Nagpur news
बोगस पीक विम्याची सखोल चौकशी; देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
sanjay raut house recce
संजय राऊत रेकीवर मंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान…म्हणाले मच्छर…
Nana Patole Criticize Devendra Fadnavis ,
“…तेव्हा गृहमंत्री फडणवीस काय करत होते?”, नाना पटोलेंचा सवाल, म्हणाले…

“एनसीबीमध्ये सुरु असलेल्या वसुलीच्या लढाईला देवेंद्र फडणवीस दुसरीकडे वळवण्याचे काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस त्या अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्या अधिकाऱ्याचे आणि फडणवीसांचे जुने संबंध आहेत. २००८ मध्ये आलेला अधिकारी १४ वर्षे मुंबईतच आहे यामध्ये काय कारण आहे. देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांवर आरोप करतात की अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत. अंडरवर्ल्डच्या लोकांना तुम्ही मुख्यमंत्री असताना सरकारी आयोग आणि मंडळांचे अध्यक्ष का केले?  मुन्ना यादव नावाचा एक कुख्यात गुंड ज्याच्यावर हत्येपासून सर्व प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि तो तुमचा राजकीय साथीदार आहे. त्या मुन्ना यादवला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष बनवले होते की नाही. तुम्ही हैदर आजम नावाच्या एका नेत्याला मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवले होते की नाही. हैदर आजम बांग्लादेशातल्या लोकांना मुंबईत आणण्याचे काम नाही करत का? हैदर आजमची दुसरी पत्नी जी बांग्लादेशी आहे ज्याची चौकशी मालाड पोलिसांनी केली होती. पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयातून ते प्रकरण दाबण्याचे काम तुम्ही केले होते की नाही. तुमच्या इशाऱ्यावर संपूर्ण महाराष्ट्रात वसुलाची काम होत होते की नाही. मुंबईच्या बिल्डरांच्या जागेचे भांडणवरुन पोलिसांत तक्रार करुन वसुली केली जात होती की नाही. जमिनींच्या मालकांना पकडून आणून त्या आपल्या नावावर केल्या जात होत्या की नाही. तुमच्या कार्यकाळात परदेशातू कुख्यात गुंड फोन करायचे, असे मलिक म्हणाले.

“८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदी झाली तेव्हा देशभरात बनावट नोट्या पकडल्या जावू लागल्या. पण ८ ऑक्टोबर २०१७ पर्यंत महाराष्ट्रात खोट्या नोटांचे एकही प्रकरण समोर आले नाही. कारण देवेंद्र फडणवीसांच्या प्रोटेक्शनमध्ये बनावट नोटांचा खेळ महाराष्ट्रात सुरु होता. ८ ऑक्टोबर २०१७ रोजी बीकेसीमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा टाकला. त्यात १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या. हे प्रकरण मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांच्या या नेक्सकमध्ये आयएसआय पाकिस्तानकडून बांग्लादेशमार्गे संपूर्ण भारतात पसरवल्या जातात. या प्रकरणी मुंबई आणि पुण्यात दोघांना अटक झाली. पुण्यात इम्रान आलम शेख याला अटक करण्यात आली. पण १४ कोटी ५६ लाख रुपयांच्या जप्तीला आठ लाख ८० हजार रुपये दाखवून प्रकरण दाबण्यात आले. आरोपीला काही दिवसांनी जामीन मिळाला. हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले नाही,” असे नवाब मलिक म्हणाले.

“नोटा कुठून आल्या याची चौकशी केली गेली नाही. कारण हे रॅकेट चालवण्याऱ्या लोकांना तत्कालीन सरकारचे संरक्षण होते. तो काँग्रेसचा नेता असल्याचा असल्याचे सांगण्यात आले. इम्रान आलम शेख हा हाजी अरफात शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेखला देवेंद्र फडणवीसांनी भाजपामध्ये आणून अल्पसंख्या आयोगाचा अध्यक्ष बनवले होते. देवेंद्र फडणवीस तुम्ही कुख्यात गुंड मुन्ना यादवला अध्यक्ष बनवता, बांग्लादेशातील लोकांना मुंबईत स्थायिक करण्याचे काम करणाऱ्याला तुम्ही अल्पसंख्याक मौलाना आझाद फायन्सान कॉर्पोरेशनचा अध्यक्ष बनवता. तुम्ही पूर्णपणे राजकारणात गुन्हेगारांचा वापर केला. रियाज भाटी कोण आहे ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावे,” असा सवाल नवाब मलिकांनी केला.

“२९ ऑक्टोबर रोजी सहार एअरपोर्टवर खोट्या पासपोर्टसह पकडला गेला. ज्याचे संबंध अंडरवर्ल्डसोबत होते. रियाज भाटी वारंवार तुमच्या सोबत प्रत्येक कार्यक्रमात का दिसत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबतही रियाज भाटीने फोटो काढले. असं काय कारण होते की रियाज भाटी पंतप्रधानांतपर्यत पोहोचला. देवेंद्र फडणवीस तुम्ही गुन्हेगारांना सरकारी पदांवर बसवले, खोट्या नोटांचे नेक्सस तुम्ही चालवले. रियाज भाटीच्या माध्यमातून वसुली केली केली. आज तर इतकेच सांगत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळी कृत्ये लोकांच्या समोर मी ठेवणार आहे,” असे मलिक म्हणाले.

Story img Loader