Devendra Fadnavis on Rahul Gandhi : भारत जोडो आंदोलन असो वा संसदेचं अधिवेशन असो, राहुल गांधी सध्या हातात लाल रंगाचं संविधानाचं पुस्तक घेऊन फिरत आहेत. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी महाराष्ट्रात येणार आहेत, त्यानिमित्ताने देवेंद्र फडणवीसांना त्यांना लक्ष्य केलं आहे. तसंच, त्यांच्या अवती भोवती अराजकता पसरवणारे लोक असल्याचा मोठा दावाही त्यांनी केला आहे.
“भारत जोडो हा समूह तयार करण्यात आला आहे. या समूहामध्ये अनेक संघटना अतिशय डाव्या विचारांच्या आहेत. त्यांच्या कामाची पद्धत, ध्येय धोरणे ही अराजक पसरवणारी यंत्रणा आहे. एकीकडे राहुल गांधी एक पुस्तक आपल्याला दाखवतात. संविधानाचा सन्मानच केला पाहिजे. पण लाल संविधानच का? कोणाला तुम्ही इशारा देताय? लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देताय? संविधानाचा अर्थ असतो ऑर्डर. तुम्ही अराजक पसरवत आहात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> अल्पसंख्याकांच्या मतांसाठी ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणणे बंद; देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका
देशाच्या एकतेला अन् एकात्मकतेला धोका
“संविधान आणि भारत जोडो याच्या नावाखाली अराजकता पसरवणाऱ्यांना एकत्र करून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. अर्बन नक्षलवादाचा हा प्रयत्न आहे. अर्बन नक्षलवादाचा हाच अर्थ आहे की लोकांची मने कलुषित करायची. त्यांच्यामध्ये अराजकतेचं एक रोपण करायचं, जेणेकरून देशातील संस्था, यंत्रणा यावरून त्यांचा विश्वास उडेल. यामुळे देशाच्या एकतेला आणि एकात्मकतेला धोका निर्माण होईल”, अशी टीकाही त्यांनी केली.
“राहुल गांधी यांची नागपुरात संविधान सभा होणार असली तरी खोट्याचे वय अत्यंत अल्प असते. लोकसभा निवडणुकीच्या काळात पसरवलेला भ्रम आता दूर झाला आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नाटक जनता आता चालू देणार नाही”, असे देवेंद्र फडणवीस काल नागपुरात म्हणाले.
राहुल गांधींचं नागपुरात संविधान संमेलन
लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी हे नागपुरातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या भागावर काँग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे प्रचाराची सुरुवातही राहुल गांधी विदर्भातील नागपूरमधून करणार आहे. ते ६ नोव्हेंबरला नागपूरला आयोजित संविधान सन्मान संमेलनात सहभागी होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी हे ६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी नागपूर येथे संविधान सन्मान संमेलन आयोजित केले असून सायंकाळी मुंबईतील बीकेसीमध्ये महाविकास ‘आघाडीची गॅरंटी’ जाहीर केली जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.