राज्यात शिंदे-भाजपा सरकार झाल्यापासून मोठे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. यावरून शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरे आणि माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई सातत्याने शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल करत आहेत. एअर बस प्रकल्पावरूनही बराच राजकीय आकडतांडव विरोधी पक्ष आणि सरकारमध्ये झाला. यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आरोप केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी काही वृत्तपत्रांच्या पुरवण्यांचा दाखला देत २०२१ सालीच टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला गेल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. “या प्रकल्पासाठी २०१६ साली टाटा आणि एअर बस यांच्यात बोलणं सुरु होते. याची माहिती मिळाल्यावर मी टाटांकडे गेलो आणि नागपुरात हा प्रकल्प होण्यासाठी २०१९ पर्यंत पाठपुरावा केला.”
“टाटा एअर प्रकल्पासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात रस्सीखेच सुरु होती. तेव्हा टाटांच्या अधिकाऱ्यांना गुजरात देत त्यापेक्ष अधिक सवलती देण्याचं आश्वासन दिलं. मात्र, महाविकास सर आल्यानंतर टाटा एअर बसने आपला निर्णय बदलला. याची माहिती मिळताच, २४ एप्रिल २०२१ ला प्रकल्प प्रमुखांना ‘सागर’ बंगल्यावर बोलवलं. त्यांना गुजरातला जाऊ नका, तुमच्या काही अडचणी असतील, मी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाण्यास तयार आहे. मात्र, टाटा एअर बसच्या प्रमुखांनी महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणूक करण्यासारखं नाही, विचार करुन निर्णय घेऊ, असं सांगितल्याचं,” उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं.
हेही वाचा : “मराठा नेतृत्वाकडे निर्णय क्षमता…”, सुषमा अंधारेंचा फडणवीस, RSS वर गंभीर आरोप
हेही वाचा :
“महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतात टाटा एअर प्रकल्प राज्यातून गेला. हा प्रकल्प नागपुरला होणार असल्याने जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं. प्रकल्प गुजरातला जाण्यापूर्वी प्रकल्पाच्या प्रमुखांनी उद्धव ठाकरेंना फोन करून, राज्यातून जाणार असल्याचं सांगितलं होतं,” असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.