गेल्या काही दिवसांपासून मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात तू-तू, मैं-मैं सुरू आहे. आता जरांगे-पाटलांनी भुजबळांवरून भाजपाला थेट इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देत आहेत. हा भाजपासाठी चांगला संदेश नाही, असं जरांगे-पाटलांनी म्हटलं आहे. ते छत्रपती संभाजीनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

जरांगे-पाटील म्हणाले, “भुजबळांचं पूर्ण आयुष्य मराठ्यांविरोधात गेलं आहे. ओबीसीमधील छोट्या-छोट्या जातींनाही भुजबळांनी विरोध केला आहे. भुजबळ दुसऱ्यांना खाऊन देत नाही. त्यांनी ओबीसी महामंडळ खाल्लं आहे.”

हेही वाचा : “मला गोळी मारली जाऊ शकते”, छगन भुजबळांच्या दाव्यावर जरांगे-पाटील टीका करत म्हणाले…

“…म्हणून भुजबळांनी तुरूंगवास भोगला”

“राज्यातील गोरगरीब जनतेचा पैसाही खाल्ल्यानं भुजबळांनी तुरूंगवास भोगला आहे. देवेंद्र फडणवीस भुजबळांना बळ देत आहेत. म्हणून भुजबळांवरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत. हा भाजपासाठी चांगला संदेश नाही,” असा इशारा जरांगे-पाटलांनी दिला आहे.

“भुजबळांवरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत”

“भुजबळांनी महाराष्ट्र सदन खाल्लं. पण, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येत आहेत. फडणवीसांची दिशा अन्याय होणाऱ्यांवर न्याय देण्याची आहे की भ्रष्टाचार करून महाराष्ट्र खाणाऱ्यांना साथ देण्याची?” असा सवाल जरांगे-पाटलांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “मला गोळी मारली जाईल, असा पोलिसांचा अहवाल”, मराठा आरक्षणप्रश्नी सभागृहात बोलताना छगन भुजबळांचा गंभीर आरोप

“भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत”

“भुजबळांचं ऐकून फडणवीसांनी निष्पाप २ ते ४ हजार लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. अंतरवालीतील लोकांना भुजबळांचं ऐकूनच अटक करण्यात आली आहे. भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत. त्यामुळे भुजबळांना बळ देऊन सरकारनं मराठ्यांचं वाटोळं करू नये,” असं आवाहन जरांगे-पाटलांनी केलं आहे.

Story img Loader