Devendra Fadnavis Big announcement : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज (रविवार, १५ डिसेंबर) सायंकाळी चार वाजता नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. तिन्ही पक्षांचे ३९ ते ४१ आमदार आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महायुतीमधील प्रमुख तिन्ही पक्षांनी अद्याप त्यांच्या संभाव्य मंत्र्यांची नावं जाहीर केलेली नाहीत. मात्र, तिन्ही पक्षांतील काही नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत सांगितलं की त्यांना वरिष्ठांकडून शपथविधीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाकडून गिरीश महाजन, जयकुमार रावल, माधुरी मिसाळ यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना त्यांना शपथविधीसाठी तयार राहण्याचा निरोप मिळाल्याचं सांगितलं आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (अजित पवार) धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार नव्या सरकारमध्ये भाजपाच्या वाट्याला १९ ते २० मंत्रिपदे आल्याची चर्चा आहे. तर, शिवसेनेला (शिंदे) १२ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला ९ ते १० मंत्रिपदं मिळणार असल्याचं बोलले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा