List of Ministers in Maharashtra 2024 Shivsena Party : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला मिळालं. महायुतीनं जोरदार पुनरागमन करत अभूतपूर्व असं यश मिळवलं. राज्यात महायुतीने २८८ पैकी तब्बल २३५ जागा जिंकल्या. तर, महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावं लागलं. एवढ्या प्रचंड प्रमाणात यश मिळवूनही महायुतीला सत्तास्थापनेसाठी १२ दिवस लागले. तर मंत्रिमंडळ विस्तार करायला आणखी १२ दिवस असे मिळून एकूण २४ दिवस लागले. अखेर आज (१५ डिसेंबर) नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा विस्तार झाला आणि ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे.

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या विानसभा निवडणुकीत भाजपाने १३२, शिवसेनेने (शिंदे) ५७ तर राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या आहेत. विजयी आमदारांच्या संख्येनुसार मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला आहे. आतापर्यंत शिवसेनेच्या (शिंदे) आठ आमदारांनी कॅबिटने मंत्रिपदाची शपथ घेतली असून यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शभूराज देसाई, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर व संजय शिरसाट यांचा समावेश आहे. तर, रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल व योगेश कदम यांनी राज्यमंत्रीपदाची शपध घेतली आहे.

Image Of Devendra Fadnavis.
Devendra Fadnavis : राज्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचे सर्वाधिकार देवेंद्र फडणवीस यांना; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मंत्रिमंडळाचा निर्णय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Jitendra Awhad gave friendly advice to Minister pratap sarnaik
जितेंद्र आव्हाड यांनी दिला मंत्री सरनाईकांना मित्रत्वाचा सल्ला
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत
Image Of Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : सर्वसामान्यांना सरकारी कार्यालयांत ‘या’ सुविधा देणे बंधनकारक, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश
Eknath Shinde criticized opposition claiming elections sealed Dhanushyaban and Shiv Sena s fate
जनतेच्या न्यायालयात धनुष्यबाण आणि शिवसेनेवर शिक्कामोर्तब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

हे ही वाचा >> फडणवीसांच्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा? तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप; साताऱ्यातील चौघांना संधी

शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी

क्र.मंत्र्याचं नावमंत्रीपद
१.एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री
२.गुलाबराव पाटीलकॅबिनेट मंत्री
३.दादा भूसेकॅबिनेट मंत्री
४.संजय राठोडकॅबिनेट मंत्री
५.उदय सामंतकॅबिनेट मंत्री
६.शंभूराज देसाईकॅबिनेट मंत्री
७.संजय शिरसाटकॅबिनेट मंत्री
८.प्रताप सरनराईककॅबिनेट मंत्री
९.भरत गोगावलेकॅबिनेट मंत्री
१०.प्रकाश आबिटकरकॅबिनेट मंत्री
११.आशिष जैस्वालराज्यमंत्री
१२.योगेश कदमराज्यमंत्री

यासह अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

हे ही वाचा >> Ajit Pawar : लोकसभेतील अपयशानंतर कोणते बदल केल्यानंतर पक्षाला विधानसभेत यश मिळालं? अजित पवारांनी सांगितली चार सूत्र; म्हणाले…

राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कोणत्या नेत्यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली?

  • हसन मुश्रीफ
  • धनंजय मुंडे
  • हसन मुश्रीफ
  • दत्तात्रय भरणे
  • आदिती तटकरे
  • माणिकराव कोकाटे
  • नरहरी झिरवाळ
  • मकरंद जाधव
  • इंद्रनील नाईक
  • माणिकराव कोकाटे

Story img Loader