Devendra Fadnavis Cabinet Expansion Nagpur : नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला असताना रविवारी सकाळपर्यंत संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर करण्यात आली नव्हती. अजूनही कोणत्याही पक्षाने मंत्र्यांची नावे अधिकृतरित्या जाहीर केलेली नसली तरी काही आमदारांनी त्यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी फोन आल्याचं सांगितलं आहे. तर काही पक्षांधील वरिष्ठांनी संभाव्य मंत्र्यांची नावं प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपाच्या १५ हून अधिक आमदारांना फोन करून शपथविधीसाठी तयार राहण्याचा निरोप दिला आहे. असाच निरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील (शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) काही आमदारांना दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र चव्हाण, छगन भुजबळ, दीपक केसरकर व सुधीर मुनगंटीवार या एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची तथा तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नावं फडणवीसांच्या मंत्रीमंडळ यादीत नाहीत. तर, वर्ध्याचे भाजपाचे आमदार पंकज भोयर यांना संधी मिळणार आहे. यासह काही नव्या चेहऱ्यांना मंत्रीपदाची संधी मिळणार आहे. रवींद्र चव्हाण हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कामकाज पाहतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.

हे ही वाचा >> Maharashtra Cabinet Expansion: अजित पवारांनी भाकरी फिरवली; ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदासाठी अद्याप फोन नाही, ‘हे’ नेते शपथ घेणार

तिन्ही पक्षांकडून सहकार पंढरीला झुकतं माप

दरम्यान, नव्या मंत्रिमंडळात पश्चिम महाराष्ट्राचा वरचष्मा पाहायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर वगळता इतर चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रीपदाची संधी मिळू शकते. कोल्हापूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचं मंत्रीपद कायम राहील. तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रकाश आबिटकर यांना संधी दिली जाईल. पुण्यातील तीन नेत्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे. यामध्ये भाजपाकडून चंद्रकांत पाटील व माधुरी मिसाळ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दत्ता भरणे यांना संधी जाणार आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : “लाडक्या बहिणींमुळे वाचलो, पण मेहुण्यांनी…”, अजित पवारांनी गाजवली सभा; महिलांना दिले महायुतीच्या विजयाचे श्रेय

साताऱ्याचे चार आमदार मंत्री होणार?

साताऱ्यात अजित पवारांच्या पक्षाकडून मकरंद पाटील, तर भाजपाकडून शिवेंद्रराजे भोसले व जयकुमार गोरे या दोन आमदारांचा आज मंत्री म्हणून शपथविधी पार पडू शकतो. तर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांचं मंत्रीपद कायम ठेवण्यात आलं आहे. देसाई देखील आज मंत्री म्हणून शपथ घेतील. शिंदेंच्या मंत्रिमंडळात ते गृहराज्यमंत्री होते.