सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपाच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या बैठकीमध्ये शाह यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वांनी सज्ज राहून, भाजपा-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपाच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी शाह यांनी शिंदे गट आणि भाजपा एकत्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी फडणवीस यांना नागपूरमध्ये या निवडणुकीमधील शिंदे गटासोबतच्या युतीसंदर्भात मोठं विधान केलं आहे. विशेष म्हणजे यावेळी फडणवीस यांनी शिंदे गटाचा केलेला उल्लेख सर्वांचं लक्ष वेधून घेणार ठरला.
नक्की पाहा >> मध्यरात्री ‘मातोश्री’वरुन फडणवीसांचा फोन, अडीच मिनिटांची बंद खोलीतील भेट अन्…; अमित शाहांनी सांगितला युती तुटल्याचा घटनाक्रम
‘‘भाजपा आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत शाह यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजपा आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिले. मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे: आशिष शेलार गेल्या निवडणुकीत जे निसटले, ते यंदा गमवायचे नाही, असे सांगून मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले, मागील निवडणुकीत १३ प्रभागांमध्ये ५० ते १०० मतांनी आपला पराभव झाला. आता १५० जागांवर विजय मिळवायचा आहे. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असून, आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचे आहे. गेल्या निवडणुकीत अधुरे राहिलेले स्वप्न २०२२ ला पूर्ण करायचे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा