Devendra Fadnavis Daughter-in-law of Subhedar of Kalyan : सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. यावरून विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवरच आगपाखड केली आहे. विरोधक शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी शिवछत्रपतींच्या इतिहासातील काही घटनांचा उल्लेख करत नवीन दावे केले आहेत. त्यावरून राजकारण अजूनच तापलं आहे.

पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काँग्रेसने अनेक वर्षे आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली असं सांगून त्यांच्याबद्दल वेगळं चित्र रेखाटलं. मात्र महाराजांनी सुरत लुटली नव्हती. त्यांनी सुरतेवर स्वारी करून काही ठराविक लोकांकडून स्वराज्यासाठी पैसे वसूल केले होते”. फडणवीसांच्या या वक्तव्यावर त्यांचे विरोधक व इतिहासकारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता आता फडणवीस यांनी आणखी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे.

Ajit Pawar meet Sharad Pawar
Ajit Pawar meet Sharad Pawar : अजित पवार-शरद पवार एकत्र येणार का? शिवसेनेच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “ते पवार आहेत, कधीही…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Chief Minister Devendra Fadnavis criticizes Sharad Pawar over assembly election defeat pune news
‘संयमाने वागून नेत्यांनी पराभव स्वीकारावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
Devendra Fadnavis On Sharad Pawar :
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांना खोचक उत्तर, “मनातून त्यांनाही माहीत आहे की पराभव…”

देवेंद्र फडणवीस टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून सादर केल्यानंतर महाराज तिच्याकडे पाहून म्हणाले, ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो’. कल्याणचा सुभेदार आपला शत्रू होता. त्याच्या सुनेला पाहून राजे म्हणाले आमची आई इतकी सुंदर असती तर आम्हीही इतकेच सुंदर झालो असतो. असं बोलून सुभेदाराच्या सुनेला परत पाठवणारा आमचा राजा होता.

बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते?

हे ही वाचा >> “जी बापाची झाली नाही, ती तुमची काय होणार?”, मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची लेकीवर टीका!

फडणवीस यांनी केलेल्या या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ शेअर करत फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. या भाषणात बाळासाहेबांनी ‘अशीच अमुची आई असती…’ ही कविता लिहिणाऱ्या कवीवर व त्या कवितेचा दाखला देणाऱ्यांवर संताप व्यक्त केला होता.

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, “आपल्याला बऱ्याचदा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचं उदाहरण दिलं जातं. सुभेदाराची सून महाराजांसमोर नजराणा म्हणून सादर केली तेव्हा तिच्याकडे पाहून महाराज म्हणाले, ‘अशीच आमची आई सुंदर असती, आम्ही देखील झालो असतो इतकेच सुंदर’. ही कविता लिहिणाऱ्या कवीच्या कानफाटात वाजवायला पाहिजे. अरे गधड्यांनो छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या आईबद्दल म्हणजेच राजमाता जिजाऊंबद्दल नितांत आदर होता. आपले राजे त्या सुभेदाराच्या सुनेसाठी स्वतःच्या मातेचा अपमान करतील का? महाराजांनी असं कधीही केलं नसतं. ते उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाहीत”.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis on Shivaji Maharaj: “माझं एकच म्हणणं आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण, म्हणाले…

फडणवीस खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचा वारसा चालवत आहेत : शरद पवार गट

शरद पवार गटाने हा व्हिडीओ एक्सवर शेअर करत म्हटलं आहे की “ज्या शिवछत्रपतींना आपल्या आईंबद्दल नितांत आदर होता ते आपले महाराज राजमाता जिजाऊसाहेबांची तुलना कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेशी का करतील? अहो फडणवीसजी, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल फक्त खोटा इतिहास पेरणाऱ्या परंपरेचा वारसा चालवता, पण आम्ही मराठी जनतेसमोर तुम्हा लोकांचा कपटी शिवद्रोही चेहरा समोर आणू”.

Story img Loader