Devendra Fadnavis Interview Rapid Fire Questions : नागपूरमध्ये शुक्रवारी (१० जानेवारी) सायंकाळी जिव्हाळा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विविध राजकीय प्रश्नांना रोखठोक उत्तरं दिलं. यावेळी त्यांना राज ठाकरे की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे की अजित पवार? नरेंद्र मोदी की अमित शाह यांच्यापैकी एका नेत्याची निवड करण्यास सांगितंल. त्यावरही त्यांनी त्यांची मतं मांडली. महायुतीचे विरोधक व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अलीकडेच भारतीय जनता पार्टीची मातृशाखा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (आरएसएस) कौतुक केलं होतं. त्यावरही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. “विधानसभा निवडणुकीत संघाने प्रचाराची योग्य रणनीती आखली होती. त्यामुळे विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळालं”.असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. पवारांनी संघाचं कौतुक केल्यावर संघ-भाजपाची शरद पवार व त्यांच्या पक्षाशी जवळीक वाढतेय का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर फडणवीसांनी सूचक प्रतिक्रिया दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा