सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाखाली भारत देश मजबूत आणि शक्तिशाली बनल्यामुळे चीनसुध्दा आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बार्शी येथे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित सभेत फडणवीस यांनी, नरेंद्र मोदी विरूध्द राहुल गांधी अशी यंदाची लोकसभा निवडणूक असल्यामुळे देशाला आणखी शक्तिशाली बनविण्यासाठी मोदी यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते, धाराशिवचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत, बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत, महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा…ईडी लावा, पक्ष फोडा अन् भाजप वाढवा; मोदी सरकारचा एककलमी कार्यक्रम, जयंत पाटील यांचे टीकास्त्र

फडणवीस यांच्या भाषणाचा मुद्दा नरेंद्र मोदी हाच होता. ते म्हणाले, करोना काळात देशात लाखो लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असताना नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना एकत्र करून करोना प्रतिबंधक लस तयार केली आणि देशातील सर्व १४० कोटी जनतेला मोफत दिली. म्हणून वाचू शकला. दुसरीकडे देशाची अर्थ व्यवस्था जगात तेराव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर आणताना पंतप्रधान मोदी यांनी देश शक्तिशाली बनविला. देशाची सुरक्षा व्यवस्था बळकट करताना सात हजार किलो मीटर अंतरापर्यंत लक्ष्य भेदू शकेल, एवढे प्रचंड मोठे अग्नी मिसाईल तयार केले. त्यामुळे चीनसारखा देशही भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, असा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis claims that even china does not have the courage to look at india with a crooked eye because of narendra modi psg