राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस आता शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकीकडे उरलेलं कामकाज पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एकमेकांवर टीका-टिप्पणी करताना दोन्ही बाजूची नेतेमंडळी दिसत आहेत. मात्र, एकीकडे आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगत असताना दुसरीकडे हलक्या-फुलक्या वातावरणात एकमेकांना कोपरखळी, चिमटे काढण्याचीही संधी नेते साधत आहेत. आज विधानसभेत असाच एक प्रसंग घडताच सभागृहात एकच हशा पिकला!

नेमकं काय घडलं?

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील बंधारे फुटल्याचा प्रश्न मांडला. “महाराष्ट्रातील ११७ तलाव व बंधारे फुटल्याची माहिती समोर आली आहे. तलावांचे त्वरीत बंधारे बांधले, तर पुढचा हंगाम व्यवस्थित होऊ शकेल. पण जिल्हा परिषदेचं म्हणणं आहे की डीपीडीसीतूव त्यांना पैसे देता येत नाहीत. उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या विभागाकडून यासाठी निधी दिला, तर शेतीचा पुढचा हंगाम व्यवस्थित होऊ शकतो. यातून किमान १० हजार हेक्टरचं सिंचन होऊ शकेल”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणांमध्ये चुकीचं काहीच नाही, या घोषणा..”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis rally in rains
Devendra Fadnavis: शिराळा येथे देवेंद्र फडणवीस यांचे भरपावसात भाषण; म्हणाले, “पावसात सभा झाली की…”
Devendra Fadnavis on Vote Jihad
Devendra Fadnavis : “महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे ‘व्होट जिहाद’ कारण..”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
Devendra Fadnavis : “काही नेत्यांना तमाशा…”; देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ Video दाखवत भाजपाचा ठाकरेंना टोला
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

फडणवीस बोलताच सभागृहात हशा

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या प्रश्नाच्या उत्तराच्या सुरुवातीलाच देवेंद्र फडणवीसांनी समोर बसलेल्या विजय वडेट्टीवारांना कोपरखळी मारली. त्यामुळए सभागृहात एकच हशा पिकला. देवेद्र फडणवीसांच्या बाजूलाच बसलेल उपमुख्यमंत्री अजित पवारही यावर हसू लागले.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधारी बाकांवरून विघानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट खुद्द अजित पवारांच्याच नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद रिक्त झालं होतं. आकडेमोडीच्या गणितानुसार विरोधकांपैकी सर्वाधिक आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदही काँग्रेसकडेच जाणार हे स्पष्ट झालं. मात्र, काँग्रेसमध्ये नेमकं कोण विरोधी पक्षनेता होईल? याविषयी निर्णय होऊ शकला नव्हता.

अखेर मंगळवारी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदावर नियुक्ती करावी, अशी विनंती करणारं पत्रक सादर केलं. त्यानुसार आज विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

होऊ घातलेले विरोधी पक्षनेते!

दरम्यान, विरोधी पक्षनेते कोण असतील, हे निश्चित झाल असलं, तरी अद्याप त्यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवार यांचा उल्लेख करताना “होऊ घातलेल्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेब”, असा केल्यामुळे सभागृहात सत्ताधाऱ्यांसह विरोधी बाकांवरील आमदारही हसू लागले. त्यावर “अजून त्यासंदर्भात घोषणा केलेली नाही”, अशी आठवण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी करून दिली. त्यावर “म्हणून तर होऊ घातलेले विरोधी पक्षनेते म्हणालो”, असं फडणवीस म्हणाले.

“त्यांनी एक महत्त्वाची सूचना दिली आहे. अशा प्रकारची माहिती मागवण्यात येईल. आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या नुकसानासाठी दुरुस्ती निधीची तरतूद करू शकतो. हे पडताळून पाहू. आणखीन कुठली गरज पडली, तर वित्तमंत्र्यांचीही मदत घेतली जाईल”, असं उत्तर यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नावर दिलं.