ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक दावा केला आहे. तुरुंगात असताना मला जवळजवळ जीवे मारण्याचाच प्रयत्न करण्यात आला होता, असे संजय राऊत म्हणाले आहेत. राऊतांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान राऊतांच्या या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (१७ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

हेही वाचा >>> संजय राऊत यांना तुरुंगात मारण्याचा प्रयत्न? पत्रकार परिषदेतील विधानामुळे खळबळ; म्हणाले “मी योग्य वेळी…”

High Court orders Mumbai Police regarding atrocity case against Nawab Malik Mumbai news
मलिक यांच्याविरोधातील ॲट्रोसिटी प्रकरणाचा तपास चार आठवड्यांत पूर्ण करा; उच्च न्यायालयाचे मुंबई पोलिसांना आदेश
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
senior citizen cheated , Crime case against cyber thieves,
पुणे : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा
Two arrested for attacking Chandrakant Tingre Pune print news
चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक; शरद पवार गटात प्रवेश केल्याने हल्ला केल्याची कबुली

सकाळी केलेला आरोप संध्याकाळी लक्षात राहात नाही

“संजय राऊत काहीही आरोप करू शकतात. ते दिवसातून तीन वेळा आरोप करतात. सकाळी कुठला आरोप केला आहे, हे संध्याकाळी त्यांच्या लक्षात राहात नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपावर मी काय बोलणार?” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

हेही वाचा >>>  पत्रकार शशिकांत वारिशे मृत्यप्रकरणी संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले “एकाच वेळी सगळे…

संजय राऊत यांनी काय आरोप केला?

संजय राऊत शुक्रवारी (१७ फेब्रुवारी) रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी मलाही तुरुंगात मारण्याचा प्रयत्न होता, असा दावा केला. मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता, असा दावा केला. “माझ्यासारख्या माणसाला तुरुंगात पाठवलं. मलाही आतमध्ये जवळजवळ मारण्याचाच प्रयत्न होता. याबाबत सर्वांनाच माहिती आहे. मी यावर योग्य वेळी बोलणार आहे,” असे मोठे विधान संजय राऊत यांनी केले. तसेच “तुम्हाला माणासं संपवण्यासाठी सत्तेवर आणले आहे का? शशिकांत वारिशे यांनी तुमचे काय वाकडे केले होते? वारिशे यांच्या आईचा आक्रोश मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी, येथील पालकमंत्र्यांनी पाहावा. हे महाराष्ट्रात चालणार नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.

Story img Loader