शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसैनिकांकडून राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. असे असतानाच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशात सर्व पक्ष संपणार असून फक्त भाजपा हा एकच पक्ष राहणार असे विधान केले आहे. नड्डा यांच्या या विधानानंतर देशभरातील विरोधकांकडून भाजपावर टीका केली जात आहे. नड्डांचे हे विधान म्हणजे हुकूमशाहीच आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान, नड्डा यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा असे म्हणालेले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >> उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

“जेपी नड्डा असे कोठेही म्हणालेले नाहीत. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना राहिलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवी शिवसेना तयार झाली आहे, असे नड्डा म्हणाले. त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करु नका,” असे स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा >> “ममता बॅनर्जी, केसीआर माझ्या संपर्कात,” विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान

जेपी नड्डा नेमके काय म्हणाले?

“भाजपाच्या विरोधात लढणारा एकही राष्ट्रीय पक्ष आज शिल्लक राहिलेला नाही. आपली खरी लढाई कुटुंबवाद आणि घराणेशाहीविरोधात आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील,” असे नड्डा म्हणाले.

हेही वाचा >> “संजय राऊतांचा मला अभिमान, काळ तुमच्यासोबतही…” ईडीच्या कारवाईनंतर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा

जेपी नड्डा यांनी शिवसेना पक्षातील दुफळीवरही भाष्य केले. “तामिळनाडूत घराणेशाही, शिवसेना जो संपत आलेला पक्ष आहे, तिथेही हेच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घराणेशाही आहे. काँग्रेस तर आता भाऊ-बहिणीचा पक्ष झाला आहे.” असे नड्डा म्हणाले.