आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. राज्यात महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जागावाटप व इच्छुकांना उमेदवारीवरून राजकीय समीकरणांची चर्चा केली जात आहे. त्यातच एकीकडे महाविकास आघाडी व महायुतीमध्ये पक्षांकडून एकत्रच निवडणूक लढवण्याचे दावे होत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांच्या भेटीगाठींची चर्चा होत आहे. यातच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची, तसेच संजय राऊत-अमित शाह भेटीची चर्चा मध्यंतरी रंगली होती. या सर्व चर्चांवर आता देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टिप्पणी करत भाष्य केलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस टीव्ही ९ च्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या राजकीय प्रश्नांना उत्तरं दिली. मी पुन्हा येईन? हा इशारा कुणाला दिला होता? असा प्रश्न त्यांना विचारला असता तेव्हा आम्ही जिंकू शकत नाही असा आत्मविश्वास असणाऱ्या विरोधी पक्षांना हा इशारा दिल्याचं फडणवीस म्हणाले.

ajit pawar sharad pawar (4)
Ajit Pawar : “लबाडाघरचं आवातनं जेवल्याशिवाय…”, अजित पवारांचा शरद पवारांना टोला; म्हणाले, “ते वक्तव्य म्हणजे नुसत्या थापा”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Maharashtra Chief Minister Eknath Shinde filed nomination from Kopri-Pachpakhadi constituency, in Thane on Monday.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी महायुतीत राहून स्वतःचं महत्त्व कसं अबाधित ठेवलं?
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?
ubt shiv sena ex city chief amar qatari slap bjp city chief shri ram ganpule in sangamner
शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखांनी भाजपा शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली; नेमके काय घडले ?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…

लोकसभा निवडणुकांवेळी काय घडलं?

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची २१ जागांवरून ९ जागांवर पीछेहाट झाली. या निवडणुकीत काय घडलं? याबाबत बोलताना फडणवीसांनी त्यावेळी अतीआत्मविश्वासात होतो, असं सांगितलं. “लोकसभा निवडणुकीवेळी राज्यघटनेबाबत मोठ्या प्रमाणावर अपप्रचार केला गेला. त्याचा एवढा प्रभाव पडणार नाही असं आम्हाला वाटलं. त्यावेळी आम्ही अतीआत्मविश्वासात होतो. पण तो प्रभाव पडला”, असं फडणवीसांनी नमूद केलं.

शरद पवारांसोबत बैठक आणि नंतर त्यांची माघार!

दरम्यान, २०१९ ला शरद पवारांसोबत सरकार स्थापनेबाबत बैठक झाल्याचं फडणवीस म्हणाले. “२०१९ ला नवं सरकार स्थापन करण्याची वेळ आली आणि उद्धव ठाकरे आमच्याबरोबर येत नसल्याचं स्पष्ट झालं. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमच्याकडे प्रस्ताव आला होता. आम्ही म्हटलं राजकारणात जिवंत राहणं आवश्यक असतं. जर उद्धव ठाकरे आमच्याशी असं वागत असतील, तर राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर विचार करू. मग आमच्या काही बैठका झाल्या. शरद पवारांशीही चर्चा झाल्या. आम्ही सगळे निर्णयही घेतले. पण शपथ घेण्याआधीच शरद पवार मागे हटले. त्यांनी आपला निर्णय बदलला. पण अजित पवार आमच्यासोबत आले. तेव्हा आम्ही ती शपथ घेतली”, असं ते म्हणाले.

Devendra Fadnavis: “महाराष्ट्रात आम्ही अतिआत्मविश्वासात होतो”, देवेंद्र फडणवीसांनी केलं मान्य; ‘या’ दोन कारणांचा केला उल्लेख!

उद्धव ठाकरेंना खरंच भेटलात का?

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याच्या चर्चा मध्यंतरी रंगू लागल्या होत्या. त्यावर फडणवीस म्हणाले, “आता तर तुम्हाला याच बातम्या आल्या आहेत. काही दिवसांनी अशीही चर्चा होईल की माझी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट झाली आणि त्यांना निवडून आणण्यासाठीही मीच प्रयत्न करतोय. त्याकडे लक्ष देऊ नका. चर्चा काहीही होत असते”, असं म्हणत फडणवीसांनी हे वृत्त फेटाळून लावलं.

Story img Loader