राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकारणाचं कौतुक करताना विरोधकांवर सडकून टीका केली. मोदींमुळे ज्यांची दुकानं बंद झाली तेच लोक एकत्र येऊन टीका करत आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. तसेच हे सर्व कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर परिणाम होणार नाही, असा दावा केला. ते गुरुवारी (२५ मे) सोलापूरमध्ये भाजपा सोलापूर शहर व ग्रामीण जिल्हा संकल्प महाविजय कार्यकर्ता संमेलनात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढलं”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे राजकारण मोडीत काढण्याचं काम केलं. सामाजिक-आर्थिक परिवर्तनाची लढाई देशाचा पंतप्रधान म्हणून लढली जाऊ शकते आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिणामकारक बदल घडवला जाऊ शकतो हे गेल्या ९ वर्षात मोदींनी दाखवून दिलं. त्यामुळे ज्यांची दुकानं बंद होत आहेत ते एकत्र येत आहेत आणि मोदींवर टीका करत आहेत.”

“हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही”

“हे कितीही एकत्र आले तरी त्याचा मोदींवर काहीही परिणाम होणार नाही. यांनी २०१९ मध्येही हे करून पाहिलं. वेगवेगळ्या राज्यांमध्येही हे करून पाहिलं. मात्र, जनता मोदींच्या पाठिशी, भाजपाच्या पाठिशी आहे. त्यामुळे लोकसभा असो की विधानसभा असो भाजपालाच पाठिंबा मिळेल,” असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

व्हिडीओ पाहा :

“शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देणार”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आता मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी ही क्रांतीकारी योजना आणली आहे. त्यात आपण कृषीवाहिन्या सोलरवर कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा १२ तास अखंडीत वीज देणार आहोत.”

हेही वाचा : “शिंदे-फडणवीसांनी आम्हाला शब्द दिला आहे की…”, प्रताप सरनाईकांचं मोठं विधान

“…तर शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ”

“यातील दुसरं क्रांतीकारी पाऊल म्हणजे सोलर फीडर तयार करण्यासाठी सरकारी जमीन नसेल, तर आम्ही शेतकऱ्यांची खासगी पडीक जमीन ३० वर्षांसाठी भाडेतत्वावर घेऊ,” असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis comment on pm narendra modi money in politics pbs
Show comments