शिवसेनेचे नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. मात्र हा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे राहता येऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप केला जातोय. याच आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही कोणावरही तसा दबाव टाकलेला नाही. राजीनाम्याबाबत पालिकेचे काही नियम आहेत, त्याच नियमानुसार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत रोते.

हेही वाचा >>> अंधेरी पोटनिवडणूक : ऋतुजा लटकेंच्या हायकोर्टातील याचिकेमुळे वाढलं गूढ; ठाकरे गटाची चिंता वाढणार?

What Gopal Shetty Said?
Gopal Shetty : भाजपात बंडखोरी! गोपाळ शेट्टींकडून अपक्ष अर्ज दाखल, म्हणाले; “बोरीवली काय धर्मशाळा…”
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
vinod tawde
जागावाटपात ठाकरे गटाकडून काँग्रेसची खेळवणूक, विनोद तावडे यांचा आरोप
Lakhan Malik
Lakhan Malik : भाजपाने तिकीट नाकारल्यामुळे आमदार लखन मलिक ढसाढसा रडले; म्हणाले, “इमानदारीने काम केलं, पण…”
Amit Thackeray Eknath shinde devendra fadnavis
Amit Thackeray : भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा? शेलारांच्या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेची वेगळी भूमिका; म्हणाले, “सरवणकरांना डावलणं…”
MLA Anna Bansode candidature has been announced from Pimpri Assembly Constituency Pimpri
पिंपरी विधानसभा: उमेदवारी जाहीर झाल्यावर आमदार अण्णा बनसोडे नाराज गटावर म्हणाले “आमच्यात वाद… “
sanjay raut on dadar mahim amit thackeray
Sanjay Raut : अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “जर…”
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

“कोणाचाही राजीनामा स्वीकारण्यासंदर्भात काही नियम असतात. त्या नियमांनुसारच राजीनामा स्वीकारायचा असतो. महापालिका स्वायत्त आहे. महापालिका ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेईल. त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही. नियम सर्वांसाठीच सारखे असतात. या प्रकरणात सरकारकडून दबाव आणण्याचा प्रश्न नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही बाजूने निवडणूक लढवू शकते,” असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या शिंदे-गट आणि भाजपाच्या संभाव्य उमेदवारावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. “बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा एकत्रितपणे ही निवडणूक लढवतील. ही निवडणूक कोणत्या पक्षाने लढवावी हे ठरवण्यासाठी आमची एक बैठक होणार आहे. त्या बैठकीत मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय ते ठरवू. त्यामुळे कोणालाही थांबवण्याचे कारण नाही,” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल होताच भास्कर जाधवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले “निखाऱ्यावरून चालताना…”

शिंदे गटाला मिळालेल्या निवडणूक चिन्हावरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले. त्यांनी ढाल-तलवार या निवडणूक चिन्हावर टीका करण्यांवर टीका केली आहे. “ढाल-तलवार हे मराठ्यांचे, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चिन्ह आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचे प्रतिक असेलेली ही ढाल-तलावर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चिन्हालाच गद्दारांचे चिन्ह म्हणणे यापेक्षा मोठी गद्दारी नाही,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.