शिवसेनेचे नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके या उद्धव ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. निवडणूक अर्ज दाखल करण्याआधी त्यांनी आपल्या पालिका नोकरीचा राजीनामा दिलेला आहे. मात्र हा राजीनामा अद्याप स्वीकारण्यात आलेला नाही. लटके यांना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी उभे राहता येऊ नये म्हणून त्यांचा राजीनामा न स्वीकारण्यासाठी पालिका प्रशासनावर दबाव टाकला जात आहे, असा आरोप केला जातोय. याच आरोपावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आम्ही कोणावरही तसा दबाव टाकलेला नाही. राजीनाम्याबाबत पालिकेचे काही नियम आहेत, त्याच नियमानुसार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर निर्णय होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर ते मुंबईत माध्यमांशी बोलत रोते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा