राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्याची गोष्ट २ जुलै २०२३ या दिवशी समोर आली होती. कारण अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान देत राष्ट्रवादी पक्षावरही दावा सांगितला होता. आज निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार यांच्याकडेच आहे असा निर्णय दिला आहे. हा निर्णय धक्कादायक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही या निर्णयाबाबत काही आश्चर्य वाटलं नाही आम्ही आता सर्वोच्च न्यायलयात दाद मागणार आहोत. शरद पवार यांनी शून्यातून विश्व उभं केलं. आम्ही पुन्हा सगळं उभं करु याची मला खात्री आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया?

आमच्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच घड्याळ चिन्ह म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळाली, मी त्यांचे, सर्व सहकारी तसेच कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Devendra Fadnavis says We Eknath Shinde Ajit Pawar Shares Funny Memes
“शपथविधीअगोदर खूप मीम्स आले, आम्ही तिघे…”, फडणवीसांनी सांगितलं ट्रोलर्सचं आवडतं मीम; अजित पवारांचा उल्लेख करत म्हणाले…
Harshvarrdhan Patil Meets Devendra Fadnavis
Harshvarrdhan Patil: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन; चर्चांना उधाण
devendra fadnavis 3.0 cm oath (1)
Devendra Fadnavis 3.0: “लहानपणी देवेंद्र बॅटिंग करायचा आणि फिल्डिंग आली की…”, फडणवीसांबद्दल बालपणीच्या मित्रांनी जागवल्या आठवणी!

२०२३ च्या जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली. तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला. त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले. तसंच, जवळपास ७ मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रिपदाची शपथही घेतली. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले. गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं. गेल्या सहा महिन्यांत याप्रकरणी १० सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या. या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते.

हे पण वाचा- मोठी बातमी! अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निवडणूक आयोगाचा निकाल

अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Story img Loader