माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीनंतर शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा असं ट्विट करुन देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्राची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात पार पडली. त्यानंतर २४ ऑक्टोबरला निकालही आले. त्या निकालात जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली. यावरुनच भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. त्यानंतर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या साथीला गेली. या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार प्रस्तावही मांडण्यात आला. आज शिवाजी पार्क मैदान या ठिकाणी झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली.