भाजपा नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीसांना जळगावात काळे झेंडे दाखवले जातील, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालक जसं सांगतील, त्याप्रमाणे एकनाथ खडसे वागतात, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली. ते जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. एकनाथ खडसे यांनी जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.

Eknath Shinde with Grand Son Rudransh
Eknath Shinde : आजोबांसाठी नातू म्हणजे दुधावरची साय! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या नातवाला खांद्यावर घेत केली गणपतीची आरती
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Devendra Fadnavis Rebuttal to Sanjay Raut
“हिंदूत्त्वाला विरोध करता-करता..”, माजी सरन्यायाधीश आणि मनमोहन सिंग यांचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांची टीका
cm Eknath shinde alandi marathi news
आळंदी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : “मी आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह भेदून…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत
Ajit Pawar, RSS Memorial, Ajit Pawar Avoids RSS Founder s Memorial, Hedgewar Smruti Mandir BJP, Nagpur, Deekshabhoomi,
अजितदादांनी दुसऱ्यांदा संघ भूमीवर जाणे टाळले, काय आहे कारण?
Eknath shinde ganesh naik dispute marathi news
१४ गावांवरून नाईक-मुख्यमंत्री वाद?
devendra fadnavis shivaji maharaj statue collapse
“पुतळ्याच्या घटनेचे राजकारण नको”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

एकनाथ खडसे यांनी काळे झेंडे दाखवण्याचा इशारा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांची व कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझं असं मत आहे की, कुणाचीही धरपकड करण्याची आवश्यकता नाही. काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे. खरं म्हणजे एकनाथ खडसेंचं असं झालं आहे की, त्यांना नवीन मालक मिळाला आहे. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं एकनाथ खडसे वागतात.”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “एकनाथ खडसेंनी जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं, तर काळे झेंडे दाखवायची वेळ त्यांच्यावर आली नसती. ते आमच्या परिवारात राहिले असते. त्यांना नवीन मालकाकडे जाण्याचीही गरज नव्हती. आम्ही अशा काळ्या झेंड्यांना घाबरणारे लोक नाहीत. असे काळे झेंडे कितीही दाखवले तरी काही फरक पडणार नाही. आम्ही जनतेसाठी काम करत आहोत. जनतेला फायदा देण्यासाठी आम्ही जळगावला आलो आहोत. जळगावची जनता आमच्याबरोबर आहे.”