मागील काही दिवसांपासून भाजपाने मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. भाजपाने काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये जलआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानंतर आज जालना शहरातही जलआक्रोश मोर्चा काढून भाजपाने राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारने आमच्या काळातील सर्व योजनांचा खून केला. या योजना सुरु झाल्या असत्या तर मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटला असता, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
हेही वाचा >>> पुणे : राहुल गांधींच्या ईडी चौकशीमुळे काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, टायर पेटवून ‘भाजपा हमसे डरती है’चे नारे
“आमचं सरकार असताना मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीचा आम्ही प्लॅन केला होता. मराठवाडा ग्रीडची योजना तयार केली होती. मराठवाड्याची ११ धरणे एकमेकांना जोडून प्रत्येक घरात नळ देऊन मराठवाड्यातील एकाही घरात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही अशा प्रकारची ग्रीड योजना केली होती. त्याचे डेंटर काढून काम सुरु केले होते. पण हे सरकार आलं आणि या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा खून केला,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा >>> “विस्थापित मावळ्यांना संघटित करून…”; स्वराज्य संघटनेबाबत संभाजीराजे छत्रपतींनी केली महत्त्वाची घोषणा
तसेच “महाविकास आघाडी सरकारने दोन वर्षात मराठवाडा ग्रीड योजनेसाठी एकही पैसा दिलेला नाही. मराठवाडा ग्रीड तयार झालं असतं तर एकाही शहराला एकाही गावाला पिण्याच्या पाण्याचा खंड पडला नासता. मराठवाड्यात दुष्काळ पडल्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा संघर्ष होतो. जायकवाडीमध्ये पाणी सोडायचं की नाही यावर संघर्ष होतो. या सरकारने आमच्या योजनांचा खून केला. पाच-सात वर्षे लागली असती पण मराठवाड्यात पाण्यासाठी मोर्चे निघाले नसते. मराठवाड्यातील शेतकरी सिंचनासाठी त्रासला नसता,” असे देवेंद्र फडणीस म्हणाले.