महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा संदर्भही वाचून दाखवला. एवढंच नाही तर कर्नाटक पॅटर्न देशात किंवा महाराष्ट्रात लागू होणार नाही. पुन्हा एकदा देशात मोदींचंच सरकार येणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

अडीच वर्षे आपण एक सरकार बघितलं. काय होतं त्या सरकारमध्ये? ते सरकार विश्वासघाताचं सरकार होतं. त्या सरकारच्या विश्वासघातापासून ते विसर्जनापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. खंडणीखोरांपासून दाऊदशी संबंध असलेल्यांचा मंत्रिमंडळात असलेला समावेश आपण पाहिला. मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षात केवळ काही तास आपण मंत्रालयात बघितलं. मोठ्या मोठ्या लोकांची गळचेपी होताना आपण बघितली. पोलिसांच्या बदल्यांमध्ये होणारं कांडही आपण पाहिलं. असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर जोरदार टोलेबाजी केली आहे.

नरेटिव्ह कसं सेट केलं जातं बघा. संजय राऊत यांना जामीन मिळाला तर लोकशाहीचा विजय आणि नवाब मलिकांना जामीन मिळाला नाही तर लोकशाहीची हत्या असं जनमत तयार करण्याचा जो प्रयत्न झाला तो आपण पाहिला. पण आता या कुठल्याही प्रयत्नाला बळी पडायचं नाही.

आता आपल्याला अलिकडच्या काळात वज्रमूठ दिसते आहे. या वज्रमुठीची काय अवस्था आहे आपल्याला माहित आहे. कुणी कुठे बसायचं? कुणी कुठे उभं रहायचं? हे सगळं काय चाललंय सांगायची आवश्यकता नाही. पण मी वज्रमुठीची दहा वाक्यं तुम्हाला सांगतो. आत्ता एक पुस्तक आलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ‘लोक माझे सांगाती.’ मी खोटं सांगत नाही. पृष्ठ क्रमांक ३१८ आणि ३१९ यावर जे लिहिलं आहे त्यातली दहा वाक्य सांगतो. वज्रमुठीचे प्रमुख शरद पवार, वज्रमुठीचा चेहरा उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणतात?.

लोक माझे सांगाती मधली कुठली दहा वाक्यं फडणवीसांनी वाचली?

१) हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच्या संवादातली सहजता उद्धव ठाकरेंसह नव्हती.

२) उद्धव ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बितंबातमी नसे. जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असायला पाहिजे होती

३) उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती.

४) त्यांचं कुठे काय घडतं आहे याचं बारीक लक्ष नसे.

५) उद्या काय घडतं आहे याचा अंदाज घ्यायची क्षमता असायला हवी होती ती नव्हती.

६) ते ओळखून काय करायचं याचं राजकीय चातुर्य असायला हवं होतं त्याची कमतरता आम्हाला जाणवत होती.

७) त्यांना अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं. तरीही हे टाळता येणं त्यांना जमलं नाही.

८) महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी माघार घेतली. संघर्ष न करता माघार घेतली.

९) उद्धव ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा आणि इतर मंत्री मात्र प्रत्यक्ष संपर्कात होते.

१०) उद्धव ठाकरेंचे फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणे हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.

आम्ही जेव्हा हे म्हटलं तेव्हा आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवलं

हे सगळं आम्ही म्हटलं आहे का? हे सगळं शरद पवारांनी म्हटलं आहे. आम्ही जेव्हा उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत म्हणत होतो तेव्हा आम्हाला महाराष्ट्र द्रोही ठरवलं गेलं. चंद्रकांत पाटील यांनाही असंच म्हटलं आहे. आता वज्रमुठीच्या प्रमुखांनी वज्रमुठीच्या चेहऱ्याबद्दल जी वाक्य लिहून ठेवली आहेत त्याबद्दल मी शरद पवारांचे कोटी कोटी आभार मानतो. आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाही. एक गोष्ट तर महाराष्ट्रात लक्षातच आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावं लागेल. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो. माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच राजीनामा मागे घेईन आणि माझ्या जागी परत येईन. त्यांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं की राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे? असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांनाही टोला लगावला आहे.

उसनं अवसान आणून सर्कशीतला वाघ होता येतं

एक लक्षात घ्या उसनं बळ घेऊन वाघ बनता येत नाही. वाघ दोन प्रकारचे असतात. एक सर्कशीतला वाघ आणि दुसरा जंगलचा राजा. जंगलचा राजा व्हायचं असेल तर स्वतःचं बळ लागतं असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.