Devendra Fadnavis Davos Visit : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २० ते २४ जानेवारी दरम्यान स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होणार आहेत. यासाठी १९ तारखेला पहाटे ते मुंबईतून रवाना होणार आहेत. सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ३ वेळा दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. तेव्हा औद्योगिक विकासात पाचव्या क्रमांकावरुन महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला होता. राज्यात त्या काळात मॅग्नेटिक महाराष्ट्राचे दोन वेळा आयोजन झाले. आताही या दौर्‍यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. यावेळी ते अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौर्‍यात उद्योगमंत्री उदय सामंत, तसेच एमआयडीसी, एमएमआरडीए, सिडको अधिकार्‍यांचे शिष्टमंडळ त्यांच्यासोबत असेल.

Unauthorized constructions to be cracked down on soon for the development of Mikarwada Jetty
मिकरवाडा जेटीच्या विकासासाठी लवकरच अनधिकृत बांधकामांवर हातोडा
Sadabhau Khot On Cabinet Expansion
Sadabhau Khot : “…म्हणून मंत्रि‍पदाची काही अपेक्षा नव्हती”,…
parking issue in mumbai
Parking Issiue in Maharashtra: महाराष्ट्रातल्या पार्किंगच्या समस्येवर जपानी तोडगा! प्रस्तावित प्रणालीमध्ये वाहन नोंदणीपासून अतिरिक्त शुल्काचाही समावेश
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”
Dhananjay Munde
धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या? कृषी साहित्य खरेदीप्रकरणी कोर्टात सुनावणी; वाढीव दर आकारल्याचा याचिकाकर्त्याचा दावा
Two brother killed in mob attack
Beed Crime News: बीड जिल्हा पुन्हा हादरला; जमावाच्या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, तिसरा गंभीर जखमी
Maharashtra Live News Updates in Marathi
Saif Ali Khan Health Updates : सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणीही ताब्यात नाही; मुंबई पोलिसांची माहिती
Murder, youth, Vita, Crime case , sangli,
सांगली : विट्याजवळ तरुणाचा खून; सात जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक
dialect languages, Dr Tara Bhavalkar, Marathi ,
बोली भाषांमुळेच मराठी समृद्ध – डॉ. तारा भवाळकर

१० क्षेत्रात करणार सामंजस्य करार

डेटा सेंटर्स, ऑटोमोबाईल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्योग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौर्‍यात होणार आहेत. महाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक राज्यात आणण्याचा प्रयत्न या दौर्‍यातून साध्य करण्याचा प्रयत्न होईल. अर्थात प्रामुख्याने यातून रोजगारनिर्मितीचेही उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे.

महाराष्ट्राने विविध प्रकारची धोरणे अलिकडेच जाहीर केली आहेत, त्याबाबतचीही माहिती ते विविध व्यावसायिक बैठकांमध्ये देणार आहेत. या ते माध्यमातून महाराष्ट्राच्या एकूणच सर्वांगिण विकासाला चालना देतील.

समतोल विकासावर भर

राज्यात गुंतवणूक आणताना किंवा पायाभूत सुविधांचा विकास करताना आम्ही सातत्याने चौफेर विकास कसा होईल आणि प्रादेशिक समतोल कसा राखला जाईल, यावर भर दिला. या दावोस दौर्‍यात सुद्धा महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल, यादृष्टीने आमचे प्रयत्न असतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Story img Loader