Devendra Fadnavis on Eknath Khadse: भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, मात्र अनेक महिन्यांनंतरही त्यांचा भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाही. दिल्लीश्वरांशी माझे बोलणे झालेले आहे, असे खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सांगितले होते. मात्र राज्यातील नेत्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली नाही. आता एका वृत्तवाहिनीशी बोलताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वेगळाच गौप्यस्फोट केला. “देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुलीची शपथ घेऊन मला राज्यपालपदाची ऑफर दिली होती”, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला होता. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देवेंद्र फडणवीसांना खडसेंच्या दाव्याबाबत प्रश्न विचारला गेला होता. यावर ते म्हणाले, “एकनाथ खडसेंचे विधान मी ऐकलेले नाही. पण खडसेंच्या बाबतीत आमच्या केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय आम्हाला सर्वांना मान्य आहे. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून, त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.”

What Eknath Khadse Said About CD?
Eknath Khadse : एकनाथ खडसेंचा दावा, “मुलीशी चाळे करणाऱ्या भाजपा नेत्याची क्लिप…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Eid-e-Milad 2024 holiday
Eid-e-Milad holiday: मुंबईत १६ सप्टेंबरची ईद-ए-मिलादची सुट्टी रद्द; महाराष्ट्र सरकारकडून नवी तारीख जाहीर, जाणून घ्या कारण
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”

हे वाचा >> Eknath Khadse : “फडणवीसांनी मुलीची शपथ घेऊन मला आश्वासन दिलेलं की…”, एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट

केंद्र सरकारच्या निर्णयाची दिली माहिती

मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या शेतमालाला अधिक दर मिळावा म्हणून महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. याचीही माहिती देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. “कच्च्या खाद्य तेलावर कुठलेही आयात शूल्क नव्हते. आता कच्च्या तेलावर २० टक्के आयात शूल्क आकारले जाणार आहे. तर शुद्ध तेलावर असलेला १२.५ टक्के कर वाढवून ३२.५ टक्के इतका करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात पिकणाऱ्या सोयाबिनचे दर वाढणार आहेत, याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच सोयाबिन खरेदीचा निर्णयही केंद्र सरकारने घेतलेला आहे. यासोबतच कापूस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“गेल्या काही काळात कांद्याचा दराचा प्रश्न निर्माण झाला होता. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने किमान निर्यात किंमत पूर्णपणे काढून टाकली आहे. तसेच निर्यात शूल्क ४० टक्क्यांवरून २० टक्क्यावर आणले आहे. यामुळे कांद्याचे दर स्थिर होण्याकरिता मोठा दिलासा मिळणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची महत्त्वाची माहिती केंद्र सरकारने मान्य केली आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पोर्ट ब्लेअरच्या नामकरणाचे स्वागत

अंदमान निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून आता ‘श्री विजयपुरम’ करण्यात आले आहे. या निर्णयाबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, मी या निर्णयाचे स्वागत करतो. गुलामींच्या चिन्हांना हटविले गेले पाहीजे. गुलामीची चिन्ह हटविण्यासाठी मोदी सरकारने जे कार्य हाती घेतले आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो.