Devendra Fadnavis : “भोंग्याला आता कसं वाटतं आहे? मला..”, हरियाणा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊतांना टोला

देवेंद्र फडणवीस यांचा संजय राऊत यांचं नाव न घेता टोला लगावला आहे, सकाळच्या भोंग्याला कसं वाटतंय ते विचारायचं आहे असं म्हटलंं आहे.

Devendra Fadnavis Slams Sanjay Raut
देवेंद्र फडणवीस यांची हरियाणा निकालानंतर संजय राऊतांवर जोरदार टीका (फोटो-लोकसत्ता)

Devendra Fadnavis : हरियाणात लोकसभेत दहा पैकी पाच जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत आपल्याला ५० जागा मिळाल्या आहेत. साठ वर्षांनंतर तिसऱ्यांदा एक पक्ष हरियाणाची सत्ता काबीज करतो आहे तो पक्ष म्हणजे तुमची आणि भारतीय जनता पार्टी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच संजय राऊत यांनाही टोला लगावला आहे.

हरियाणामध्ये मतदारांनी फेक नरेटिव्ह नाकारला

हरियाणामध्ये, मतदारांनी सांगितलं की फेक नरेटिव्हच्या विरुद्ध आम्ही मतदान करणार आहोत. अग्निवीरच्या विरोधात रान पेटवलं गेलं, खेळाडूंना पुढे करुन रान पेटवलं गेलं. जातीपातीची लढाई करण्यात आली. मात्र सगळ्या गोष्टींना मतदारांनी नाकारलं आणि मोदींचं विकासाचं राजकारण हवं आहे हे या निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिलं. या निवडणुकीचा अन्वयार्थ काय आहे तर तो हाच आहे की जनता केवळ आणि केवळ मोदींच्या पाठिशी आहे. राहुलबाबा विरोधी पक्षनेते झाल्यानंतर नाटक आणि नौटंकी करत आहेत. त्याला कुणीही भुलणार नाही हे हरियाणाच्या जनतेने सांगितलं.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “देवा भाऊ जो बोलता है, वो करता है, और जो नहीं बोलता वो…”, देवेंद्र फडणवीसांची डायलॉगबाजी, विरोधकांना इशारा

पहिली सलामी हरियणाची दुसरी महाराष्ट्राची

राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिली सलामी हरियाणाने दिली आहे. यानंतरची सलामी महाराष्ट्र देणार आहे. हा विजय भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा विजय आहे. हा विजय मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना जमिनीवर आणणारा विजय आहे. मी केवळ हरियणाचं बोलणार नाही तर जम्मू काश्मीरमध्ये कुठला पक्ष जिंकला? मी म्हटलं कुठला पक्ष जिंकला हे महत्त्वाचं नाही तिथे भारत आणि लोकशाही जिंकली आहे. कारण जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील त्यांनी येऊन बघावं की आम्ही काश्मीरमध्ये निवडणूक घेऊन दाखवली. कुठलीही भीती किंवा तत्सम वातावरण कुठेही नव्हतं. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या निवडणुका आपण घेऊन दाखवल्या. आंतराराष्ट्रीय जगतात पाकिस्तान जे सांगत होता की सेनेच्या माध्यमातून कब्जा केला आहे. त्या पाकिस्तानच्या थोबाडीत मारणारी निवडणूक आपण घेऊन दाखवली. जगाने मान्य केलं की ३७० कलम हटवणं योग्य होतं. जम्मू काश्मीर भारताचं अविभाज्य अंग आहे. असं देवेंद्र फडणवीस आहे. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कुणाचं बनणार हे महत्त्वाचं नाही. असंही फडणवीस म्हणाले.

सकाळी ९ च्या भोंग्याला विचारायचं आहे आता कसं वाटतंय?

महाराष्ट्रातल्या जनतेला मी सांगू इच्छितो की आम्ही मातणार नाही. आम्हाला विजयाने नम्रता शिकवली आहे. फेक नरेटिव्हवर विजय मिळवता येत असेल पण तसं एखादवेळी होतं प्रत्येकवेळी नाही. आज मी मोदींचे आभार मानतो तसंच देशभरातल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सकाळी ९ वाजता बोलणारा भोंगा रात्रीपासून स्क्रिप्ट तयार करुन बसला होता. काय काय बोलू आणि काय नाही असं झालं होतं. आज भोंग्याला विचारायचं आहे आता कसं वाटतंय? कारण जनतेशी बेईमानी करुन निवडून आलेले लोक आहेत. जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊत यांनाही टोला लगावला. आज भोंग्याला कसं वाटतं आहे? असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांनी ही टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Devendra fadnavis first reaction on haryana result he slams sanjay raut scj

First published on: 08-10-2024 at 17:04 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
Show comments