गुरुवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या कवितेचा व्हिडीओ भाजपाने पोस्ट केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. ज्यानंतर अवघ्या एक तासात महाराष्ट्र भाजपाने तो व्हिडीओ डिलीट केला. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांची खिल्लीही उडवली आहे. अशात या सगळ्या प्रकरणावर आता दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“मला कधी कधी आश्चर्य वाटतं. पहिला प्रश्न असा आहे की एखाद्याला यायचं असेल तर तो काही व्हिडीओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे. काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. लक्षात ठेवा, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत. एखादा व्हिडीओ असा पडला आणि तसा पडला याचा अर्थ काढणं चुकीचं आहे.” असं उत्तर देऊन देवेंद्र फडणवीस यांनी हा विषयच संपवला आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

शरद पवारांनाही उत्तर

“शरद पवार आणि माझ्यात हाच फरक आहे. आमदारांचं बळ माझ्याकडे जास्त असलं तरीही आम्ही पूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठिशी उभे आहोत. एकनाथ शिंदेंच्याच पाठिशी राहणार. ते आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा विकास घडवण्यासाठी त्यांच्या पाठिशी आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात ३०५ खासदार निवडून येतात त्यांनी ज्यांचे ४ खासदार निवडून येतात यांचा धसका घेतलाय असं म्हणणं याला काय म्हणायचं? मी शरद पवारांची पत्रकार परिषद ऐकली नाही. त्यामुळे त्यावर बोलणार नाही. असंही फडणवीस म्हणाले.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची ती कविता?

“मी पु्न्हा येईन. याच ठिकाणी, याच निर्धाराने, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी. नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी!” भाजपा महाराष्ट्राने ही कविता काही वेळापूर्वीच पोस्ट केली आहे. ज्यावरुन विविध चर्चा आता सुरु झाल्या आहेत. पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील का? समजा अपात्रतेचा निर्णय झाला तर पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील का? एक-ना दोन चर्चा सुरु झाल्या आहेत. इतकंच नाही तर महाराष्ट्र भाजपाने ही कविता पोस्ट केल्यानंतर त्यातल्या उत्तरांमध्येही लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. काही युजर्स तर शपथविधी सोहळा कधी आहे? असाही प्रश्न विचारत होते मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संपवला ाहे

Story img Loader