देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालेली आहे अशी बोचरी टीका आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. तसंच शिंदे गटावर आणि एकनाथ शिंदेवरही त्यांनी कडाडून टीका केली. या सगळ्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना कुठे आग होते आहे हे आम्हाला माहित आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मोदी @९ या कार्यक्रमात भाषण करत असताना देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोले लगावले आहेत.

काय म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी?

“उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे कुणी स्क्रिप्ट रायटर होते ते देखील बहुदा शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसकडून उधारीवर त्यांनी स्क्रिप्ट रायटर आणले आहेत. आज म्हणाले देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे की सहनही होत नाही की सांगता येत नाही. उद्धवजी तुम्हाला कुठे, कुठे आग होते आहे हे तुम्हाला सांगताही येत नाही आणि सहन होत नाही. आम्हाला ते माहित आहे. कुठे , कुठे कशी आग होते आहे.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे पण वाचा- “…म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं”, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण, म्हणाले…

भाजपाच्या पाठीत उद्धव ठाकरेंनी खंजीर खुपसला

“उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, २०१९ मध्ये तुम्ही भाजपाच्या पाठीत तुम्ही खंजीर खुपसलात. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. काँग्रेस, राष्ट्रवादीसह तुम्ही खुर्चीच्या मोहाने गेलात. त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं, मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, समंदर हूँ लौटकर जरुर आऊंगा. परत तर आलोच शिंदेजींनाही सोबत घेऊन आलो. हे अजूनही भाषणंच ठोकत आहेत. रोज यांचे लोक पक्ष सोडून चालले आहेत. ४० आमदार यांच्या नाकाखालून पक्ष सोडून गेले. यांना समजतही नाही. मला आठवतं की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्यादिवशी काँग्रेस-राष्ट्रवादीसह जाण्याची वेळ येईल तेव्हा मी शिवसेनेचं दुकान बंद करेन. पण उद्धव ठाकरे खुर्चीसाठी त्यांच्यासह गेले. त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केला. बाळासाहेबांचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या रुपाने पुन्हा जिवंत केला. ” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“आज मोदीजींविषयी आणि अमित शाह यांच्याविषयी उद्धव ठाकरे काय काय बडबडले? मला यांना म्हणावसं वाटतं की कोण होतास तू काय झालास तू? अरे वेड्या कसा वाया गेलास तू?” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Story img Loader