Devndra Fadnavis in Gadchiroli: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी या भागातील काही महत्त्वाच्या नक्षलवादी म्होरक्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विकासकामांचंही उद्घाटन करण्यात आलं. त्यातच अहेरी-गर्देवाडा बस मार्गाच्या उद्घाटनाचाही समावेश होता. या भागात स्वातंत्र्यानंतर म्हणजेच ७७ वर्षांत पहिल्यांदाच राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस धावली. या भागातून आता नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी होऊन प्रशासनाचा प्रभाव तयार झाल्याचंही फडणवीसांनी नमूद केलं.

काय म्हणाले देवेंद्र फडणीस?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवादाचा बिमोड केल्याची प्रतिक्रिया दिली. “आजचा दौरा विशेष आहे. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांत पहिल्यांदाच अहेरी-गर्देवाडा या मार्गावर बस धावली आहे. या बसचं उद्घाटन मी केलं. पेनगोंड्याला एक नवीन आऊटपोस्ट तयार करून आता एकप्रकारे गडचिरोली जिल्ह्याला छत्तीसगडशी जोडण्याचं काम आपण सुरू केलं आहे. ज्या भागात माओवाद्यांचा मोठा प्रभाव होता तिथे आता आपला प्रभाव तयार झाला आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
butibori flyover latest marathi news
गडकरींच्या जिल्ह्यातील उड्डाण पूल खचला, एक किमी वाहनांच्या रांगा
car hit student bus Motala , car hit person Death Motala ,
बुलढाणा : बसचे इंजिन तापल्याने पाणी घालायला उतरला आणि इतक्यात…
Navi Mumbai Police detained four Bangladeshi nationals living in rented room on Saturday
खारघरमध्ये चार बांगलादेशीय नागरीक ताब्यात
Pankaj bhoyar vidhan sabha
“आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…
Bus catches fire on Mumbai-Goa highway
मुंबई गोवा महामार्गावर धावत्‍या बसला आग, सुदैवाने सर्व ३४ प्रवासी बचावले
youth on two wheeler seriously injured in collision with Pune bus
विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसची दुचाकीस्वाराला धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी; येरवड्यात अपघात

गडचिरोलीत मानव-वन्यजीव संघर्षात वाढ; वर्षभरात रानटी हत्ती, वाघाच्या हल्ल्यात १० बळी

“गडचिरोली महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला जिल्हा!”

“सगळ्या प्रकारे लोकांनी माओवाद्यांना नाकारलंय. १२ गावांनी ठराव करून माओवाद्यांना धान्य देणं नाकारलं आहे. त्यांनी दिलेले ओळखपत्र पोलिसांत जमा केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नवी पहाट होऊ लागली आहे. याला महाराष्ट्राचा शेवटचा जिल्हा म्हणू नका. हे महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आहे. हा महाराष्ट्राचा पहिला जिल्हा आहे. तसं काम आम्ही सुरू केलं आहे”, असंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

“कोनसरीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन मी मुख्यमंत्री असताना केलं होतं. आता त्याच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मी करतोय. अनेक प्रकल्पांचं आज उद्घाटन-भूमिपूजन होतंय. यातून १० हजार लोकांना रोजगार मिळालाय. अजून १० महिन्यांत प्रकल्प पूर्णत्वास गेल्यावर आणखी ५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. गडचिरोलीला ‘स्टील सिटी ऑफ इंडिया’ करण्याच्या दिशेनं आपली वाटचाल सुरू झाली आहे”, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

नक्षलवादाचा बिमोड

“गेल्या ४ वर्षांत गडचिरोली जिल्ह्यातला एकही तरुण किंवा तरुणी नक्षलवादी संघटनेत सहभागी झालेले नाही. त्यांचे वरीष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर शरण येत आहेत. त्यामुळे लोकांचा विश्वास भारताच्या संविधानावर आहे, नक्षलवादावर नाही, हे आता हळूहळू स्पष्ट होत आहे. नक्षलवादाचं कंबरडं मोडलं आहे, अजून मोडलं जाईल”, असंही ते म्हणाले.

Story img Loader