बाळासाहेब ठाकरेंनी कधीही बेईमान्यांना मांडीवर घेतलं नाही. गद्दारांना लाथा मारुन हाकलून द्या सांगितलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे असं म्हणत संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला राष्ट्रपतींना बोलवलं गेलं पाहिजे असं म्हणत मोदी सरकारवर टीका केली. त्याच पत्रकार परिषदेत राऊत यांनी फडणवीसांनाही टोला लगावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?

अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली. त्याविषयी प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचा काहीही परिणाम होणार नाही. मोदींना हरवण्यासाठी सापनाथ-नागनाथ एकत्र आले असतील तर येऊ द्या असं म्हटलं होतं. २०१९ लाही अशाच प्रकार सगळे विरोधक एकवटले होते. मात्र काय झालं हे देशाने पाहिलं. २०२४ लाही नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होतील. उद्धव ठाकरे पाच वर्षे ज्यांच्यासोबत सत्तेत होते त्यांचा म्हणजेच आमचा साधा फोनही घेतला नाही. आता मात्र ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंवर टीका केली होती अशांना मातोश्रीवर बोलवून बटाटेवडे खाऊ घालत आहेत असंही फडणवीस म्हणाले. याबाबत प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. शिवसेनेत सर्वात मोठी फूट त्यावेळी पडली. तसंच उद्धव ठाकरेंनी २९ जून २०२२ ला राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे हे भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाले आहेत. शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडल्यापासून सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह गेलेल्या ४० आमदारांचा उल्लेख गद्दार असा केला जातो आहे. पुन्हा एकदा संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ आली आहे असं म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस हे आता संजय राऊत यांच्या टीकेला काही उत्तर देतात का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनेकदा ते संजय राऊत यांच्या म्हणण्याला उत्तर देणं टाळतात. मात्र आज केलेली टीका अत्यंत बोचरी आहे त्यावर फडणवीस प्रत्युत्तर देणार का? हे पहावं लागणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis is driving the cars of traitors said sanjay raut scj
Show comments