देवेंद्र फडणीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टर माइंड आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय मंत्री संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंची बदली केली असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय.

निरज गुंडे हा देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी काम करतोय असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. गुंडेच्या माध्यमातूनच देवेंद्र फडणवीस यांचं मायाजाल चालायचं असं नवाब मलिक म्हणाले आहेत. जयदीप राणा या ड्रग्ज पेडलरचा फोटो मी ट्विटरवर पोस्ट केलाय असं सांगत मलिक यांनी वर्मा नावाच्या व्यक्तीने राणाबद्दलची सर्व माहिती दिल्याचं म्हटलं आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील तणावाच्या परिस्थितीवर पंकजा मुंडेंचं मोठं विधान; म्हणाल्या, “मी गृहमंत्र्यांशी…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Devendra Fadnavis and PM Narendra Modi
Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “देवाभाऊ” म्हणताच दिलखुलास हसले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नेमकं काय घडलं?
anil Deshmukh Devendra fadnavis
‘गुड गव्हर्नन्स’ अहवालावरून माजी गृहमंत्र्यांकडून फडणवीस यांच्यावर टीका
Sharad Pawar and Vinod Tawade over Amit Shah Critisicm
Vinod Tawade : “पवारांनी दाऊदच्या हस्तकांना हेलिकॉप्टरमधून प्रवास घडवला”; विनोद तावडेंचा गंभीर आरोप!
Devendra Fadnavis talk about his political career in BJP and about RSS
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कबुली, म्हणाले, “संघ स्वंयसेवकाला आदेश पाळायचा असतो, तेच मी केले म्हणून भाजपमध्ये…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

देवेंद्र फडणवीस यांचं ड्रग्जच्या धंद्याशी काय कनेक्शन होतं याची चौकशी व्हावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. जयदीप राणा आणि नीरज गुंडेसोबत त्यांचे काय संबंध आहेत, याची चौकशी व्हावी. यासंदर्भात न्यायिक चौकशी व्हावी, देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे सिद्ध करावे, असं आवाहन फडणवीस यांना केलंय. तसेच फडणवीसांचे या ड्रग्ज प्रकरणाशी काय संबंध आहेत, याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी मलिक यांनी केली.

भाजपामध्ये अनेक जण ड्रग्ज पेडलर होते, असाही आरोप मलिक यांनी केलाय. मला बोलण्यापासून रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू होता, असा स्पष्ट आरोप मलिक यांनी केलाय. केला.

फडणवीस मुंबईतील ड्रग्ज रॅकेटला संरक्षण देत होते. त्यामुळे केंद्र सरकारने एक चौकशी समिती नेमून या प्रकरणाचा तपास करायला लावावा. लोकांच्या मनात भीती निर्माण व्हावी, यासाठी त्यांनी यंत्रणेचा वापर केल्याचंही मलिक म्हणाले. जयदीप राणा सध्या तुरुंगात आहे. याच राणाने देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी गायलेल्या गाण्यासाठी फायनान्स हेड म्हणून काम पाहिल्याचंही नवाब मलिक म्हणालेत.

Story img Loader