“अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला ‘अर्थसंकल्प २०२३-२४’ नीट ऐकला तर २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची आठवण येते. त्यांनीही अशीच छोट्या छोट्या समाजांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली होती. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा झाला. या वेळी फडणवीस यांनीदेखील विविध जातींना, समाजघटकांना खूश करण्याचा प्रयत्न केला. त्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प आगामी निवडणुकीची चुणूक दाखविणारा आहे का? अशी शंका येते”, अशी प्रतिक्रिया लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०२३-२४ वर बोलताना दिली आहे.
अर्थमंत्री म्हणून फडणवीसांनी आपला पहिलाच अर्थसंकल्प आज सादर केला.