विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली. तसेच, राजकीय टोलेबाजीनं सभागृहात अनेकदा हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं. मात्र. या राजकीय टोलेबाजीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळातील अधिवेशनाच्या कामकाजाचा यावेळी उल्लेख केला.

“२०१४ च्या शेवटच्या टप्प्यात विखे पाटील जेव्हा विरोधी पक्षनेते असताना आमच्याकडे आले, तेव्हा वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले. छोटा काळ होता. एकच अधिवेशन त्यांना मिळालं. पण त्याही अधिवेशनात त्यांनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
PM Narendra Modi
“मोदी व न्यायाधीशांना मारण्यासाठी पाण्यात विष…”, पंतप्रधानांचा केजरीवालांच्या ‘त्या’ वक्तव्यावर पलटवार
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Vinayak Raut On Shinde Group Ajit Pawar Group
Vinayak Raut : “शिंदे गट आणि अजित पवार गटाला लवकरच…”, ठाकरे गटातील नेत्याच्या दाव्याने खळबळ
MLA Rohit Pawar On NCP Sharad Pawar
Rohit Pawar : शरद पवार भाकरी फिरवणार? रोहित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “आमच्या पक्षात फेरबदल…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेसचा…”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं शिर्डीत महत्वाचं विधान

“वडेट्टीवारांना सरकारमध्ये चांगलं खातं मिळालं नाही”

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी विजय वडेट्टीवार यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये चांगलं खातं मिळालं नसल्याचं नमूद केलं. “विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं काम केल्यानंतर नवीन मंत्रीमंडळात वडेट्टीवारांना चांगलं खातं मिळेल असं वाटत होतं. खाती सगळी चांगलीच असतात. पण तरी ज्येष्ठतेनुसार काही खाती असतात. तसं खातं त्यांना मिळालं नाही. मग आम्हाला बातम्या वाचायला मिळाल्या की वडेट्टीवार नाराज आहेत. मग वाचायला मिळालं की नाना पटोले आता मंत्री होत आहेत आणि वडेट्टीवार अध्यक्ष होतील. अशा बातम्या होत्या. पण शेवटी वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन खात्याचा कारभार सांभाळला”, असं फडणवीस म्हणाले.

“विक्रमात मी अजित पवारांच्या खालोखाल, आधी मुख्यमंत्री…”, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत टोलेबाजी!

“आता आमच्या संग्राम भाऊंचं काय होणार?”

“तुमचं नाव घोषित करता करता उशीर झाला. आता आमच्या संग्राम भाऊंचं काय होणार माहिती नाही. त्यांचं नेहमी असं का होतं? गेल्या वेळी नाना पटोलेंनी आपलं अध्यक्षपद सोडलं. त्यानंतर आम्ही शेवटपर्यंत ऐकत होतो की संग्रामभाऊंचं नाव येणार, संग्रामभाऊ अध्यक्ष होणार, त्यांची चिठ्ठी झालीये, चिठ्ठी दिल्लीहून निघाली आहे. ती निघता निघता कुठे अडकते. ती नाही झाली हे उत्तमच आहे. शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही, त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी संग्राम थोपटेंचा उल्लेख करत टोला लगावला.

“आम्ही हात मिळवताना तुमचे चेहरे घाबरले होते, विजयभाऊंना…”, एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला; वडेट्टीवारांचा कला उल्लेख!

“मी आपल्याला आश्वस्त करतो की विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडाल, राज्याच्या वतीने आम्ही कुणीही उत्तर देताना सकारात्मक उत्तर देऊ. मी अडीच वर्षं विरोधी पक्षनेता होतो. मी पोटतिडकीनं भाषण करायचो. पण उत्तर शिवाजी पार्कहून यायचं. विधानसभेतलं उत्तरच मिळत नव्हतं. विधानसभेत शिवाजी पार्कचं उत्तर मिळायचं. त्यामुळे आता तसं होणार नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

Story img Loader