उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. मात्र नुकतंच अमृता फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देवेंद्र फडणवीसांबद्दल तक्रार केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमोल कोल्हे व अमृता फडणवीस यांनी राज ठाकरेंना काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची त्यांनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यावेळी अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीस हे घरी वेळ देत नाही, अशी प्रेमळ तक्रार राज ठाकरेंकडे केली. यावर राज ठाकरेंनी ‘मला तुमच्या घरच्या प्रश्नांमध्ये आणू नका’, असे म्हणतं सविस्तर उत्तर दिले.
आणखी वाचा : “…तरच लग्न करेन”, अमृता फडणवीसांनी देवेंद्र फडणवीसांना लग्नापूर्वी घातलेली अट

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
devendra fadnavis ajit pawar eknath shinde (3)
Devendra Fadnavis Video: गृहखातं पुन्हा तुमच्याकडेच येणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अरे बाबा…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका

“देवेंद्र फडणवीस हे कायम मला व्यस्त असल्याचे सांगतात. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं की तुम्हाला कुटुंबाबरोबर वेळ मिळतो का, तुम्ही एकत्र कधी फिरायला जाता का?” असे या मुलाखतीत अमृता फडणवीसांनी म्हटले. त्यापुढे अमृता फडणवीसांनी “मी तुम्हाला हे याचसाठी विचारते की ते कायम मला म्हणतात की, बिझी राजकारणी असेच असतात”, असेही म्हटले.

यावर राज ठाकरे म्हणाले, “मी तुम्हाला एक गोष्ट निश्चित सांगेन की, देवेंद्र फडणवीस हे २०१४ मध्ये सत्तेत आले. ते मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या खांद्यावर जबाबदारी असते. आताही ते उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे गेल्या काही ७ ते ८ वर्षात ते तु्म्हाला वेळ देऊ शकले नसतील, परंतु तुम्हाला त्यांनी आधी वेळ दिला आहे. तुमचे फोटो मी पाहिले आहेत.”

आणखी वाचा : शर्मिला ठाकरे राजकारणात आल्या अन् तुमच्या पुढे निघून गेल्या तर झेपेल का? अमृता फडणवीसांच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले…

“पण मला ते भेटले तर मी नक्कीच याबद्दल त्यांच्याशी बोलेन. मी त्यांना काही ठिकाणंही सुचवेन”, असेही राज ठाकरेंनी यावेळी म्हटले. त्यावर अमृता फडणवीसांनी “धन्यवाद, त्यांना काही ऑफर असतील त्याही सांगा”, असेही त्या म्हणाल्या.

देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस डिसेंबर २००५ मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. अमृता फडणवीस या एक बँकर असण्याशिवाय गायिका म्हणून विशेष सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी भाषेतील गाणीही गायली आहेत.

Story img Loader