विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक पुस्तक वाचकांसाठी आणले आहे. ‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ असे या पुस्तकाचं नाव आहे. त्यात फडणवीस यांनी केंद्राकडून राज्यसरकारला मिळालेल्या निधीचा लेखाजोखाच मांडला आहे.
हे पुस्तक प्रकाशित करण्यात आल्याची माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरवर म्हटले आहे की, “‘आत्मनिर्भर महाराष्ट्र-आत्मनिर्भर भारत‘ हे नवीन पुस्तक वाचकांपुढे सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे. मराठी/हिंदी/इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोरोना काळात आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी समाजातील सर्व घटकांना दिलासा देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान जाहीर केले. त्याचा महाराष्ट्राला कसा लाभ होणार याचे सोप्या शब्दात यात विश्लेषण आहे.”
Book Launch | Join LIVE as we launch my book AatmaNirbhar Maharashtra, AatmaNirbhar Bharat on historic package & work done for Maharashtra by Hon PM @narendramodi ji https://t.co/a7AcuDWPUH
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 4, 2020
या ३६ पानी पुस्तकाला भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ‘संदेश’ही दिला आहे. शिवाय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या पुस्तकाला शब्दरुपी शुभेच्छाही दिल्या. या छोटेखानी कार्यक्रमाला चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडेजी, आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.