Devendra Fadnavis New CM of Maharashtra Swearing Ceremony : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलंय. ते विदर्भातील पाचवे व नागपूरचे दुसरे मुख्यमंत्री ठरतील.

फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ या दरम्यान पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्री राहिल्यानंतर २०१९मध्ये औटघटकेचे मुख्यमंत्रीपद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधीपक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधीपनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदे भूषविली होती.

Adani group, dharavi, Adani group dharavi banner,
नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Shambhuraj Desai, tourism Maharashtra ,
महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू, पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही
cm Devendra fadnavis pa
मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली मोठी माहिती
Bihar assembly elections will be held under the leadership of Nitish Kumar Modi Information from Deputy Chief Minister Samrat Chaudhary
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती
Uday Samant in Ratnagiri Pali, Uday Samant,
औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र एक नंबरलाच राहणार – उद्योगमंत्री उदय सामंत
Shambhuraj Desai
पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर विराजमान होणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठरला. तर उर्वरित भाजपाच्या आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर अनुमोदन दिलं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे.

महायुती सरकारचा शपथविधी उद्या

महायुती सरकारचा शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात पार पडणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून, त्यावर पहिल्या रांगेत पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची आसन व्यवस्था असेल. तर मागे एका बाजूला मंत्री, तर दुसऱ्या बाजूला काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची व्यवस्था करण्यात येणार आहे. तर समोर सुमारे २५ हजार लोकांच्या बैठकीची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महायुतीला सत्तेवर आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महिलांसाठी शपथविधीच्या ठिकाणी ‘लाडकी बहीण कक्ष’ उभारण्यात येणार असून, तेथे १० हजार महिलांची व्यवस्था केली जाणार आहे.

२३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीला निर्वावद बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं. बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता येणार हे निश्चित झालं होतं. परंतु, मुख्यमंत्री पदावरून अडलं होतं. एकनाथ शिंदेंही मुख्यमंत्री पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती. त्यामुळे हा तिढा कधी संपणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. दुसरीकडे भाजपाचा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची घोषणा करणेच बाकी होते.प दरम्यान, आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीचत विधिमंडळ नेता निवडीची औपचारिकता पार पाडली. बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून आले होते.

हेही वाचा >> Maharashtra Government Formation Live Updates : “मी महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत घालतो”, देवेंद्र फडणवीसांचं विधानभवनात भाषण!

देवेंद्र फडणवीसांनी मानले आभार

“एका कार्यकर्त्याला सर्वोच्च पदावर तीन वेळा मोदींनी बसवलं. अर्थात, एकदा ७२ तासांसाठीच होतो. पण तरीही तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री होतो. त्यामुळे तीन वेळा मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याचा मान मोदींनी दिला. हा पक्ष त्यांच्या नेतृत्वात मोठा झाला. त्यातूनच सामान्य कार्यकर्त्याला वेगवेगळी पदं मिळाली, काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी मोदींचे आभार मानतो. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही आभार मानतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?

“महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचा हा निर्णय संपूर्ण भारतासाठी एक संदेश आहे. या नियमित विधानसभा निवडणुका नाहीत. लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रातील निवडणुका महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. महाराष्ट्रात मिळालेला अभूतपूर्व विजय विकसित भारतच्या दिशेनं मोठा संदेश आहे. जनता त्यांच्या अनुभवाच्या आधारे निर्णय घेत असल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीच्या सरकारच्या कारकिर्दीला कंटाळून जनतेनं हा कौल दिला आहे”, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

उच्चविद्याविभूषित

देवेंद्र फडणवीस यांचे शालेय शिक्षण भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावर असलेल्या नागपुरातील इंदिरा कॉन्व्हेंटमधून झाले. त्यानंतर त्यांनी शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात आणि धरमपेठ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यांनी नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून १९९२ मध्ये पदवी प्राप्त केली. त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि डीसीई, बर्लिनमधून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्रात पदविका प्राप्त केली आहे.

भूषलेली पदे

१)मुख्यमंत्री
२)विरोधीपक्ष नेते
३)उपमुख्यमंत्री
४) नागपूरचे महापौर
५)नगरसेवक

पक्ष संघटनेतील सहभाग

१) प्रभाग अध्यक्ष, भाजयुमो
२) पदाधिकारी, नागपूर (पश्चिम) भाजपा
३)नागपूर अध्यक्ष, भाजयुमो
४)प्रदेशाध्यक्ष-भाजप

Story img Loader