Devendra Fadnavis Oath Ceremony as Maharashtra CM : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर महायुतीचा थपथविधी सोहळा आज (५ डिसेंबर) पार पडाला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. मुंबईतील आझाद मैदान येथे हा भव्य सोहळा पार पडाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. राजकीय क्षेत्राबरोबरच क्रीडा, चित्रपट आणि उद्योग जगतातील अनेक मान्यवर देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.
इकडे देवंद्र फडणवीस यांनी तिसर्यांचा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहेत. सोशल मिडियावरदेखील सगळीकडे फडणवीस यांच्याच नावाची चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ‘देवेंद्र फडणवीस’ (#DevendraFadnavis) याबरोबरच ‘तो पुन्हा आला’ (#ToPunhaAala) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागल्याचे पाहायला मिळाले. या हॅशटॅग वापरून वापरकर्ते मोठ्या प्रमाणावर देवेंद्र फडणवीस यांचे जुने फोट आणि व्हिडीओ समाज माध्यमांवर पोस्ट करत आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणाले होते. यावरून फडणवीस यांना बरेच ट्रोल करण्यात आले. आता ते खरोखर पुन्हा आले आहेत. याच पार्श्वभूमीवर देंवेंद्र फडणीस यांच्या चाहत्यांकडून ‘तो पुन्हा आला’ असा हॅशटॅग वापरून पोस्ट केल्या जात आहेत.
हेही वाचा>> सचिन तेंडुलकर ते शाहरुख-सलमान… फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याला ‘या’ मान्यवरांची हजेरी…
अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत, याबद्दल प्रतिक्रिया देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “देवेंद्र फडणवीस सहाव्यांदा आमदार झाले आणि तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत, याबद्दल खूप आनंद वाटतो. पण आनंदापेक्षा एका जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले. महायुती आता एकत्र आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी कायम एकत्र राहिल. त्यांचे जीवन संघर्षपूर्ण राहिलेले आहे. मी हे जवळून पाहिले आहे. जिद्द, चिकाटी आणि संयम या गुणांमुळेच ते आज इथवर पोहोचले आहेत. संयम हा त्यांचा सर्वोच्च असा गुण आहे.”
म्हणून ते पुन्हा येईन म्हणाले होते
मी पुन्हा येईन या देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेबद्दल बोलताना अमृता फडणीस म्हणाल्या की, “जेव्हा आपल्याला काही साध्य करायचे असते. तेव्हा अर्जुनासारखे केवळ लक्ष्य असले पाहिजे. त्यांना पुन्हा खुर्चीसाठी यायचे नव्हते. त्यांना पुन्हा यासाठी यायचे होते कारण त्यांना विश्वास होता की, ते महाराष्ट्रासाठी जे काही करू शकतात, ते इतर कुणी करू शकत नाही. या विश्वासासाठी ते पुन्हा आलेले आहेत, याचा मला आनंद वाटतो”, असेही आमृता फडणवीस म्हणाल्या.