Devendra Fadnavis Oath : महाराष्ट्राची निवडणूक २० नोव्हेंबरला पार पडली. त्यानंतर २३ नोव्हेंबरला जो निकाल लागला त्यात महायुतीला महाप्रचंड यश मिळालं आहे. २३७ जागांवर महायुतीने विजय मिळवला आहे. दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याचा निर्णय बुधवारी म्हणजेच ४ डिसेंबरला झाला आहे. या शपथविधीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाही निमंत्रण देण्यात आल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

५ डिसेंबरला संध्याकाळी ५.३० ला शपथविधी

देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज बुधवार ५ डिसेंबर २०२४ ला संध्याकाळी ५.३० वाजता शपथ घेतील. महाराष्ट्राला देशातलं क्रमांक एकचं राज्य करण्याची क्षमता ज्या व्यक्तीमध्ये आहे असे लोकनेते देवेंद्र फडणवीस हे आज मुख्यमंत्री म्हणून शपथ (Devendra Fadnavis Oath) घेतील. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेला आम्ही जो जाहीरनामा दिला होता त्यातली वचनं यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत मी त्यांना शुभेच्छा देतो असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
kedar shinde post for suraj chavan
“सूरज चव्हाण या तुमच्यातल्या माणसाला…”, दिग्दर्शक केदार शिंदे यांची पोस्ट चर्चेत
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

हे पण वाचा “आज फक्त तिघांचाच शपथविधी”; बाकीच्या आमदारांना कधी संधी मिळणार? मुनगंटीवारांनी महायुतीचं पुढचं नियोजन सांगितलं

एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी

राज्यपालांकडे किती मंत्री शपथ घेणार याची यादी गेली आहे. एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तीन शपथविधी ( Devendra Fadnavis Oath ) होतील असंच दिसतं आहे. दरम्यान तिन्ही नेत्यांनी आणखी काही निर्णय घेतला किंवा वरिष्ठांनी काही निर्णय घेतला तर आम्ही त्याची वाट बघू असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. आज सरकारचा शपथविधी ( Devendra Fadnavis Oath ) होतो आहे. सामाजिक विकास करण्यासाठी आमचं सरकार काम करेल.

उद्धव ठाकरे, शरद पवार यांना निमंत्रण दिलं आहे

सर्वांना सरकारने निमंत्रण दिलं आहे. प्रोटोकॉलनुसार हे निमंत्रण करायचं असतं. देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांशी संवाद साधला आहे. विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तसंच सगळेच माजी मुख्यमंत्री त्यांना माझी विनंती आहे की राजकारण संपलं आहे त्यामुळे त्यांनी शपथविधीला ( Devendra Fadnavis Oath ) उपस्थित रहावं. माझी ही विनंती उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले, राज ठाकरे अशा सगळ्याच नेत्यांना आहे. विकास हा सर्वांगिण असला पाहिजे. विकास काही सत्ताधारी पक्षासाठी वेगळा आणि विरोधकांसाठी असा वेगळा नसतो. हा काही पक्षाचा शपथविधी नाही हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आहे त्यामुळे सगळ्यांनी उपस्थित रहावं अशी आमची इच्छा आहे शिष्टाचारानुसार सगळ्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Story img Loader