Devendra Fadnavis oath taking ceremony invitation card : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास १० दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळत नव्हतं. अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे आज स्पष्ट झालं आहे. आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस व शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) यांनी राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. उद्या (५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडेल.

दरम्यान, या शपथविधीची निमंत्रण पत्रिका समाजमाध्यमांवर पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ही निमंत्रण पत्रिका शेअर केली आहे. यावर लिहिलं आहे की देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आपण कृपया उपस्थित रहावे, ही विनंती. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ही निमंत्रण पत्रिका जारी केली आहे.

nda government set up a national commission to review the performance of constitution zws
संविधानभान : संविधानाच्या कामगिरीचा आढावा 
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
minister Sanjay rathod
“मृद व जलसंधारण विभागात तीन हजार पदे भरणार”, मंत्री संजय राठोड यांची घोषणा; पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले…
institutions values and provisions in indian constitution
संविधानभान : आधुनिक भारताची संस्थात्मक उभारणी
News BJP
BJP : भाजपा निवडणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष, कुठल्या खास निकषांवर होणार निवड?
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास
devendra fadnavis gadchiroli guardian minister
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना हवंय ‘या’ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद; मित्रपक्षांनी सहमती दिल्यास जबाबदारी स्वीकारणार!

सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले आहेत की उद्या अजित पवार एकनाथ शिंदे यांचादेखील शपथविधी होईल. फडणवीसांनी सांगितलं की मी स्वतः एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये सहभागी होण्याची विनंती केली आणि शिंदे यांनी त्यास सहमती दर्शवली आहे. तसेच आमची पदं बदलली असली तर ही पदं केवळ तांत्रिक बाबी आहेत. आम्ही तिघेही राज्याची जबाबदारी सांभाळू, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा >> VIDEO : “शिंदेंचं माहित नाही, मी तर उद्या शपथ घेणार”, अजित पवारांचं मिश्कील वक्तव्य, तर शिंदेंनीही घेतली फिरकी

एकनाथ शिंदेंना मंत्रीमंडळात राहण्याची फडणवीसांकडून विनंती

“मी एकनाथ शिंदेंना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीने त्यांनी मंत्रीमंडळात राहावं. त्यांचाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळेल अशी मला खात्री आहे. त्यामुळे आम्ही तिघे व आमच्या पक्षाचे इतर नेते, मित्रपक्ष असे मिळून चांगलं सरकार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न आम्ही करू”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Story img Loader