Devendra Fadnavis oath taking ceremony invitation card : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर गेल्या जवळपास १० दिवसांपासून सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. मात्र, मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळत नव्हतं. अखेर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे आज स्पष्ट झालं आहे. आज भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची सर्व आमदारांनी गटनेतेपदी एकमताने निवड केली आहे. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. फडणवीस व शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) यांनी राजभवनावर जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. उद्या (५ डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या नेत्यांचा शपथविधी पार पडेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा